यवतमाळ सामाजिक

आखिल भारतीय किसान सभेचे तहसील कार्यालयावर धरणे आंदोलन

 प्रतिनिधी माहुर – सुरेखा तळनकर

आखिल भारतीय किसान सभेचे तहसील कार्यालयावर धरणे आंदोलन

शेतकरी, शेतमजुराच्या विविध मागण्यासाठी आखिल भारतीय किसान सभेच्या राज्य केंद्राने दिलेल्या राज्यव्यापी धरणे आंदोलनाची हाक दिल्याप्रमाने त्याचाच भाग म्हणून तहसील कार्यालय माहुर येथे दि.२३ नोव्हें. २०२२ किसान सभेच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात येत आहे.

राज्यात झालेल्या प्रचंड अतिवृष्टीचा मोठा परिणाम शेतकऱ्यांच्या दैनंदिन जगण्यावर झाला त्याच सोबत शेतकऱ्यांच्या आत्महत्या मध्ये सुद्धा वाढ झाल्याचे दिसत आहे आत्महत्या पर्याय नसून लढा शेतकऱ्यांनी केला पाहिजे व केंद्र सरकार चा शेतकरी विरोधी, कामगार विरोधी व जन विरोधी धोरणाच्या विरोधात देश भर आंदोलनाची हाक देण्यात आली दि. २६ नोव्हें रोजी सविधान दिनी हजारो शेतकरी शेतमजुर तहसील कार्यालयावर धडकणार आहे. अतिवृष्टीने शेतातील पिके गेली .पिक विमा भरला जिल्हाधिकारी यांनी २५ % अग्रिम रक्कम देण्याचे विमा कंपन्यांना आदेश दिले यानुसार सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांना १३ हजार ५०० रुपये मिळायला हवे परंतु प्रत्यक्षात मात्र हेक्टरी ४ हजार देत आहे. तर अनेकांना अद्याप काहीच दिले नाही. तसेच महाकाय चिमटा धरण बांधण्याचा घाट घालत ९५ गाव पाण्यात बुडवून लाखो लोकांना विस्तापीत करण्याचा डाव आहे .

राज्य सरकारने त्वरित ओला दुष्काळ जाहीर करुण चालु वर्षाचे खरीपाचे कर्जमाफ करावे व दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना ५० हजार एकरी मदत द्यावी तसेच १००% पिक विमा जाहीर करावा, चिमटा धरण रद्द करावे.या व इतर मागण्यासाठी दि.२३ नोव्हेबर पासुन धरणे आंदोलन सुरू असून या संदर्भात काही ठोस कार्यवाही न झाल्यास हजारो शेतकरी दि.२६ ला तहसील कार्यालयावर धडकतील असे किसान सेभेचे जिल्हाध्यक्ष काॅ. शंकर सिडाम यांनी बोलतांना इसारा दिला आहे.

यावेळी काॅ. किशोर पवार, काॅ. प्रल्हाद चव्हाण, काॅ. डाॅ.बाबा डाखोरे, काॅ. गांगजी मेश्राम, काॅ. वसंत राठोड, काॅ. प्रफुल्ल कऊडकर, काॅ. राजु राठोड ,प्रेमसिंग चव्हाण, किसणराव जगदाळे, गणेश जाधव, वसंतराव चव्हाण, इसमाईल मामु, सुजान भारती, शोभा राठोड, तारासिंग जाधव, रायभान पिलवंड, दत्ता केंद्रे, काॅ. सुनिल चांदेकर, काॅ. बाबु दोहीले सह शेकडो शेतकरी महिला पुरूष हजर होते.

Copyright ©