यवतमाळ सामाजिक

कायद्याचे राज्य निर्माण करण्यासाठी सर्वांनी कायद्याचे पालन करावे – न्यायाधीश एस.एस गाडवे.

 प्रतिनिधी माहूर -सुरेखा तळनकर

कायद्याचे राज्य निर्माण करण्यासाठी सर्वांनी कायद्याचे पालन करावे – न्यायाधीश एस.एस गाडवे.

माहूर न्यायालयात सविधान दिन उत्साहात साजरा.

तालुका विधी सेवा समितीच्या वतीने माहूर येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात संविधान दिन दि.२५ नोव्हें रोजी उत्साहात साजरा करण्यात आला. संविधान दिनानिमित्त घेण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी न्यायालयाचे न्यायाधीश एस.एस गाडवे हे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून अॅड डि.एस सोनटक्के,अॅड सि.एम राठोड,अॅड डि.जी काळे हे उपस्थित होते.

कायद्याचे राज्य निर्माण करण्यासाठी आपण सर्वांनी कायद्याचे पालन करुन समाजात समता व समानता प्रस्थापित करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे अहवान संविधान दिनानिमित्त न्यायाधीश एस.एस गाडवे यांनी केले. संविधान दिन हा आपल्यासाठी गौरवशाली दिवस असुन संविधान तयार करण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा मोलाचा वाटा असल्याचेही यावेळी अॅड डि.एस सोनटक्के यांनी सांगितले.यावेळी डि.जी काळे यांनी सविधानाचे महत्व काय आहे. यांच्यावर मोलाचे मार्गदर्श केले.त्यानंतर भारताच्या संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन व्हि.एम गूरह यांनी केले.

यावेळी न्यायालयातील अधीक्षक बी.के हांडेबाग,आर.एन भोसले,सतीष चटलेवार,भंडारे,मुजाहीद,रोहित पवार,सुश्मा परेकर तर माहूर तालुका वकील संघाचे उपाध्यक्ष एस,एस राठोड, सचिव डि.आर मेहता,जेष्ठ वकील ए.एम वैद्य,ए.एम ढगे,एस.पी.चांदेकर,एस.पी कांबळे,सि.डी वाठोरे,पी.पी ठेपेकर,व्ही.एम चव्हाण,जे.व्ही अडकिणे यांचेसह वकील संघाचे सर्व सदस्य, पक्षकार,न्यायालयातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व्हि.यू भवरे यांनी तर आभार डि.के येऊतकर यांनी मानले.

Copyright ©