यवतमाळ सामाजिक

वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाकडून विद्यार्थ्यांचा छळ

वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाकडून विद्यार्थ्यांचा छळ

येथील विद्यार्थी शासकीय सेवेपासून वंचित,
अधिष्ठाता म्हणातात की आम्ही तुम्हाला ओळखत नाही,

श्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथील बी पी एम टी विद्यार्थी अधिष्ठाता कडून हिन दर्जाची वागणूक देत असल्याने अनेक विद्यार्थी त्रस्त झाले आहे ,येथील विद्यार्थ्याना हॉस्टेल मध्ये विद्यार्थ्याना सुविधा नाही आणि सिक्युरिटी तिथे वास्तव्यास असल्याचे सांगण्यात येत आहे,विद्यार्थी
अधिष्ठाता याना हॉस्टेल च्या प्रश्नावरून भेटायला गेले असता अधिष्ठाता म्हणतात “तुम्ही आमचे विद्यार्थी नाही आहे ‘ आणि हे कॉलेज एम् बी बी एस साठी आहे . कोण कोण बी पी एम टी. मी त्यांना ओळखत नाही असे उत्तर दिल्या जात आहे .
व कॉलेजला या अथवा नका येऊ पोस्टिंग करा अथवा नका करू ” असे बेताल वक्तव्य अधिष्ठाता करीत आहे काही विद्यार्थी वस्ती गृहात असताना वस्ती गृह खाली करण्यास सांगण्यात आल्याने या विद्यार्थ्यांनी कुठे राहायचे असा प्रस्न येथील विद्यार्थ्याना पडल्याने रुग्णालयाच्या समोर आंदोलन सुरू केले बी. पी एम टी या कोर्सला
३०० विद्यार्थी प्रवेशित असून दिवस रात्र कार्यरत आहेत. ही बाब बी. पी एम टी च्या अस्मितेला काळ भासणारी ही घटना असून ह्या घटनेचा येथील विद्यार्थ्यांनी आंदोलन करीत निषेध नोंदवला आहे,
विद्यार्थ्यांना ओळखत नाही
विद्यार्थी कोणाच्या अधिपत्याखाली शिक्षण घेत आहो ? मग विद्यार्थ्यांनी त्यांच्या
समस्या कोणासमोर मांडायच्या? असा प्रश्न उपस्थित होत आहे,या ठिकाणी वाचनालय सुरू आहे परंतु,या वाचनालयात एम बी बी एस च्या पुस्तकां वेतिरिक्त एकही पुस्तक नाही,येथील विद्यार्थ्यांवर आंतरवासिता लादल्या जात आहे,या करीता कोणत्याही प्रकारचे वेतन,मानधन नाही,तरी टेक्निशियन च्या खांद्याला खांदा लावून काम करतात,शेकडो विद्यार्थी बाहेर गावाचे असल्याने त्यांची शैक्षणिक शुल्क भरण्याची परिस्थीती नसतानाही,परिस्थितीवर मात करून शिक्षण घेत आहे, यातच रुग्णालय प्रशासनाने या विद्यार्थांना त्रास दिल्या जातो असल्याने येथील विद्यार्थी त्रस्त झाले आहे यावेळी अधिष्ठाता डॉ.मिलिंद फुल्पाटील काहीही बोलण्यास तयार नसल्याचे दिसून आले, डॉ.शेख यांनी विद्यार्थांची समजूत काढत आम्ही आपले प्रस्न आमच्या अधिकारात असल्यास सायंकाळी मीटिंग घेऊन निकाली काढण्याचे आश्वासन दिले.

Copyright ©