यवतमाळ सामाजिक

श्रीदत्तजयंती उत्सवाचे अनुषंगाने नियोजन बैठक संपन्न.

 प्रतिनिधी माहूर सुरेखा तळनकर

श्रीदत्तजयंती उत्सवाचे अनुषंगाने नियोजन बैठक संपन्न.

श्रीदत्तजयंती उत्सवानिमित्त येणाऱ्या भाविकांना येथील देवीदेवतांचे सुलभरीत्या व आल्हाददायक वातावरणात दर्शन घडावे म्हणून करण्यात येणाऱ्या उपाय योजनेच्या अनुषंगाने बुधवार दि.२३ नोव्हें. रोजी दु. ३ वा.तहसील कार्यालयात तहसिलदार किशोर यादव यांच्या अध्यक्षतेत विभाग प्रमुखांची बैठक पार पडली.

माहूर येथे पार पडणाऱ्या मोठ्या यात्रेपैकी एक असलेल्या श्रीदत्त जयंती उत्सवाचे अनुषंगाने न.पं.,राज्य परिवहन मंडळ, विद्युत वितरण कंपनी,आरोग्य विभाग,पोलिस प्रशासन, वन विभाग,सार्वजनिक बांधकाम, पंचायत समिती आदी विभाग प्रमुखांनी व श्रीदत्त शिखर संस्थानच्या व्यवस्थापकांनी करण्यात येणाऱ्या उपाय योजनेची सविस्तर माहिती सभागृहा पुढे ठेवली.बैठकीला पं. स.चे गटविकास अधिकारी सुरेश कांबळे,मुख्याधिकारी तथा नायब तहसीलदार डॉ.राजकुमार राठोड, पो. नि. नामदेव रिट्ठे,ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.किरणकुमार वाघमारे, शाखा अभियंता रापर्तीवार, विस्तार अधिकारी डॉ. रमेश गावंडे,सार्वजनिक बांधकाम विभागाचे खान,शिखर संस्थानचे व्यवस्थापक ॲड.उज्वल भोपी, श्री रेणुका देवी संस्थानचे कर्मचारी नितीन गेडाम, शारदासुत खामनकर यांचेसह पत्रकारांची उपस्थिती होती.

Copyright ©