यवतमाळ राजकीय

यवतमाळ जिल्ह्यातील दोनशेचेवर लोकप्रतिनिधी,पदाधिकाऱ्यांनी दिले बाळासाहेबांचे शिवसेनेला समर्थन

यवतमाळ जिल्ह्यातील दोनशेचेवर लोकप्रतिनिधी,पदाधिकाऱ्यांनी दिले बाळासाहेबांचे शिवसेनेला समर्थन

पालकमंत्री संजय राठोड यांचे नेतृत्वात घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट

जून महिन्यात शिवसेनेत झालेल्या उठावानंतर यवतमाळ जिल्ह्या शिवसेनेत ताकद कोणाची हा विषय चर्चिला जात होता.यावतमाळ जिल्ह्यातील सातही विधानसभा क्षेत्रातील नव्वद टक्के पेक्षा जास्त लोकप्रतिनिधीनी पालकमंत्री संजय राठोड यांचे नेतृत्वात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे उपस्थितीत ‘बाळासाहेबांची शिवसेनेला’ पाठिंबा दिल्याने ह्या चर्चांना आता विराम मिळाला आहे.आज मुंबई येथे यवतमाळ जिल्ह्यातील सोळा जिल्हा परिषद सदस्य,एकूण तीस पंचायत समिती सदस्य,तसेच एकूण चौषष्ठ नगर परिषद सदस्यांनी यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांचे नेतृत्वात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व ‘बाळासाहेबांचे शिववसेनेला’ पाठिंबा जाहीर केला.ह्या भेटीचे अनुषंगाने यवतमाळ जिल्ह्यात बाळासाहेबांचे शिवसेनेच्या मागे असलेली ताकद दिसून आली .ह्या प्रसंगी यवतमाळ वाशीम लोकसभा मतदार संघाच्या खासदार भावनाताई गवळी तसेच हिंगोली लोकसभा मतदार संघाचे खासदार हेमंत पाटील प्रामुख्याने उपस्थित होते.ह्या कार्यक्रमात जिल्हा परिषद सदस्य व उमरखेड विधानसभा सहसंपर्क प्रमुख चितांगराव कदम ह्यांनी पोफळी व मुळावा परिसरातील सरपंच,उपसरपंच,सहकार क्षेत्रातील अनेक समर्थकांसह ‘बाळासाहेबांची शिवसेनेला’ समर्थन दिले.रमेश आडे,प्रवीण मिरासे,डॉ बी एन चव्हाण हे आधीच बाळासाहेबांचे शिवसेनेत दाखल झाले आहेत.आता चितांगराव कदम यांचे समर्थनाने उमरखेड विधानसभेत बाळासाहेबांचे शिवसेनेला विशेष बळ मिळाले आहे.ह्या सोबतचबमहागाव नगर पंचायतीचे नगर सेवक व गटनेते रामराव नरवाडे ह्यांचे नेतृत्वात तीन नगरसेवकांनी देखील मुख्यमंत्री शिंदे यांना पाठिंबा दिल्याने आता उमरखेड विधानसभेत जुन्या जाणत्या अनुभवी नेत्यांची मोठी फौज पालकमंत्री संजय राठोड यांचे सोबत आली आहे.तसेच राळेगाव नगर पंचायतीचे सभापती संतोष कोकुलवर ह्यांनी सुद्धा ‘बाळासाहेबांची शिवसेनेला’ह्याच कार्यक्रमात समर्थन दिले.पालकमंत्री संजय राठोड यांचे नेतृत्वात येत्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत बाळासाहेबांची शिवसेनेचा भगवा जिल्ह्यात सर्वदूर फडकवू असे वचन सर्व पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले.
येत्या काळात विविध पक्षांचे पदाधिकारी सुद्धा मोठ्या संख्येने बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश करणार आहेत.त्यासाठी पालकमंत्री संजय राठोड हे जिल्ह्यातील सातही विधानसभांचचा दौरा करणार आहेत.त्या नियोजनाची जबाबदारी पक्ष पदाधिकाऱ्यांना देण्यात आलेली आहे.
ह्या प्रसंगी माजी जिल्हा प्रमुख पराग पिंगळे,जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा कालिंदा पवार,महाराष्ट्र पतसंस्था फेडरेशचे संचालक राजूदास जाधव,उमरखेड शिवसेना सहसंपर्क प्रमुख चितांगराव कदम,कृषी उत्पन्न बाजार समिती नेर सभापती भाऊराव ढवळे,जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती श्रीधर मोहोड,माजी बांधकाम सभापती गजानन बेजांकीवार,माजी उपजिल्हा प्रमुख हरिहर लिंगनवार,घाटंजी नगर पालिका उपाध्यक्ष व माजी उपजिल्हा प्रमुख शैलेश ठाकूर,जिल्हा अल्पसंख्यांक आघाडीचे प्रमुख व सतत 5 वेळ नगर सेवक म्हणून निवडून येणारे नूर मोहोम्मद खान,पांढरकवडा नगर पालिका नगर सेवक साजिद शरीफ,माजी जिल्हा प्रमुख विनोद मोहितकर,महागाव नगर पंचायत नगरसेवक गटनेते रामराव नरवाडे,सतत चार वेळा जिल्हा परिषदेवर निवडून येणारे डॉ बि एन चव्हाण,सतत पाच वेळ नगरसेवक पदी निवडून येणारे गजानन इंगोले,माजी बांधकाम सभापती रमेश आडे,शिवसेना जिल्हा समन्वयक गोपाळ पाटील,सह संपर्क प्रमुख रमेश अग्रवाल,उमरखेड पंचायत समिती माजी सभापती प्रवीण मिरासे,दारव्हा पंचायत समिती सभापती सुनीताताई राऊत,दिग्रस पंचायत समिती सभापती अनिता राठोड,नेर पंचायत समिती सभापती मधुमती चव्हाण,जिल्हा परिषद सदस्य विष्णू उकंडे,भरत मसराम,अश्विनी कुरसिंगे,विनोद खोडे पाटील,सचिन राठोड,रुपेश कल्यमवार,आतिष राठोड,लखन राठोड,नगराध्यक्ष बबनराव इरवे,तालुका प्रमुख मनोज नाल्हे,तालुका प्रमुख मनोज सिंगी,तालुका प्रमुख उत्तम मामा ठवकर,शहर प्रमुख दीपक आडे,शहर प्रमुख राजू दुधे,शहर प्रमुख प्रणित मोरे, माजी शहर प्रमुख निलेश बेलोकर,युवासेना जिल्हा समन्वयक अभिषेक पांडे,माजी सहसंपर्क प्रमुख अमोल मंगाम,राजकुमार वानखेडे,शहर प्रमुख राजू राठोड,युवासेना उपजिल्हा युवा अधिकारी अविनाश कदम,तालुका युवा अधिकारी कपिल पाटील,योगेश वर्मा,,गजानन सोळंके,संतोष जाधव,टिकाराम खाडे, सुधाकर गोरे, किशोर नांदेकर, मोरेश्वर सरोदे, विशाल किन्हेकर,जयवंत बंडेवार,राजू तुरणकर,राजेंद्र जाधव निलेश गावंडे, राजू दुधे, ड्रा. दामोधर लढढा, ललित लांजेवार,बालू चेडे, सचिन महल्ले,गणेश पागिरे,संजीव चोपडे,मनीष सुरावार,भावना मेहता,सौ दर्शना पांड्या,नाना सुगंधे,दीपक शर्मा,सुभाष राठोड यासह शिवसेनेचे पदाधिकारी,लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About the author

Patrakar Shakti

Add Comment

Click here to post a comment

Copyright ©