यवतमाळ सामाजिक

ऑल आर्टिस्ट पेंटर संघटने चा राज्यस्तरीय मेळावा माहूर येथे संपन्न !

 माहूर  प्रतिनिधी सुरेखा तालणकर

ऑल आर्टिस्ट पेंटर संघटने चा राज्यस्तरीय मेळावा माहूर येथे 

माहूर येथे ऑल आर्टिस्ट & पेंटर संघटना महाराष्ट्र राज्य यांचा राज्य स्तरीय पहिले स्नेह मिलन मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला सदर मेळाव्याचे उद्घाटन माहूर नगरीचे नगराध्यक्ष फिरोज भाई दोसानी यांच्या शुभ हस्ते दिप प्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी विशेष बाब म्हणून माहूर तालुक्यातील पत्रकार बांधवांचा यथोचित सन्मान करून गौरविण्यात आले.
या वेळीनांदेड येथील पेंटर चंद्रकांत अडागळे पेंटींगची काम करताना सिडी वरून पडल्याने त्यांचा मृत्यू झाला त्यांना भावपूर्ण श्र‌द्धांजली अर्पण करण्यात आली. असे अनेक प्रसंग काम करत असतांना अनेक पेंटर बांधवांना आपले हात-पाय गमवावे लागले याची शासनाने दखल घेण्यात यावी . बालाजी मंगलम माहूर येथे आयोजित स्नेह मेळाव्यास राज्यातील सर्व जिल्यातील १९५ आर्टिस्ट तथा पेंटर बांधवांची उपस्थित होती, पेंटर बांधवांच्या विवीध मागण्या जसे पेंशन मिळणे, अपघात विमा मिळणे, सुरक्षा कवच योजनेत समावेश करणे, कलेतील शिक्षण घेतलेला कलावंतांना शासनाच्या नौकरी मध्ये विशेष आरक्षणाची तरतूद , पाल्यांना शैक्षणिक शुल्क माफ करावे. अश्या अनेक मागण्या शासन दरबारी मांडण्यासाठी सुंदर मेळाव्या चे आयोजन करण्याचा मुख्य उद्देश होता. या कार्यक्रमा चे प्रास्ताविक महाराष्ट्रातील प्रसिद्ध पेंटर जावेद भाई आर्णी’वाले यांनी केले. या वेळी जावेद पेंटर
यांनी आमच्या मागण्या शासन दरबारी पोहोच वाव्यात अशी आशावाद व्यक्त करून पेंटर बांध वांना विवीध पैलूंवर सविस्तर मार्गदर्शन करून येणाऱ्या भावी काळातील नियोजनाची दिशा सर्व पेंटर बांधवांना विषद केली. या कार्यक्रमासाठी – प्रसिद्ध चित्रकार रणजीत वनकर चक्रधर घुले राजू वंजारे,राज पेंटर नागपूर, संजय साबजवार, राजू गज्जलवर राम चव्हाण-शिल्पकार , रफीक भाई, मालेगाव नाशिक, अकील भाई गोंदिया चक्रधर धुले यवतमाल, धर्म लोहटे, पेटर अशोक गोंदिया, गणेश सूर्यवंशी , गिरी पेंटर विडूल, मधुकर मेश्रम, नौशाद व जुबेर पेंटर, सुरेश खैरे, हरीश पेंटर अमगाव, या सह अनेक दिग्गज पेंटर या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातील काना कोप-यातून भा मेळाव्यासाठी उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शेषरावपाटील यांनी तर द्वितीय सत्र सुत्र संचलन दिपक सुकलकर व अनिल उमरे यांनी केले तर आभार माहूर पेंटर संघटनाअध्यक्ष जविंद भाई पेंटर किनवट पेंटर संघटना अध्यक्ष हनिफ भाई/ महागाव चे पेंटर तायडे, यांनी मानले तर या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी साठी रामू इंगोले, राजू सोनकुसरे विनोद का तले,शिवसेना तालुका संघटक सुरेश आराध्ये पेंटर, पोरण वार पेंटर, राठोड पेंटर, सुरेश्वार, संदिपान वाघाडे, दुर्गा सिंह राठोड,, विशाल मस्के, तांदुरकर यासह अनेक परिश्रम घेतले

Copyright ©