यवतमाळ शैक्षणिक

स्कूल बस अभावी विद्यार्थ्यांचे नुकसान

स्कूल बस अभावी विद्यार्थ्यांचे नुकसान

स्कूल बस मुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे या बाबत अनेक वेळा सूचना दिल्या परंतु कोणत्याही प्रकारची दखल घेतल्या जात नाही या बाबत विचारणा केली असता अनेक कारणे सांगण्यात येते,कधी गाडी नादुरुस्त आहे,महिला वाहकास वेळ झाला,,गाडी आत मध्ये असल्याने गाडी काढण्यास वेळ लागला तर मशीन नादुरुस्त होती, हे नेहमीचे कारण झाले असल्याने विद्यार्थ्याना तर त्रास आहेच परंतु प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहे कारण तर वेळेवर बस कधीच मिळत नाही,तास न तास बसची वाट पहावी लागते काही मार्गावर तर वीणा प्रवाशी बसेस धावत असल्याचे अनेक उदाहरण पहावायस मिळते,अनेक बसेस रस्त्यातच बंद पडलेल्या पहावयास मिळते येथील डेपो मॅनेजर यांचे कोणत्याही प्रकारचे नियत्रंण नसल्याने प्रवासी त्रस्त होत आहे एकही बस नियमित राहत नाही पाच नंतर एकही साधारण बस आर्णी मार्गे सोडल्या जात नाही शाळा सुटली की शेकडो विद्यार्थी दोन दोन तास बस च्या प्रतिक्षेत असल्याचे पहावयास मिळते चौकशी कक्षात विद्यार्थ्याना योग्य माहिती हि दिल्या जात नाही उपाशा पोटी बस्थांकावर बस ची प्रतीक्षा करावी लागते आणि मॅनेजर दिसत नाही हि बाब अत्यंत गंभीर असून यात सकाळी येणारी स्कूल बर कधीच वेळेवर येत नसल्याने विद्यार्थिनीचे नुकसान होत आहे विद्यार्थी कधीच वेळेवर शाळेत पोहचत नाही याची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेऊन विद्यार्थ्याना योग्य सुविधा देण्यात याव्या अशी मागणी पालक करीत आहे.

Copyright ©