यवतमाळ सामाजिक

आर के एस इंग्लिश मीडियम स्कूल ला राज्यस्तरीय पुरस्कार..

आर के एस इंग्लिश मीडियम स्कूल ला राज्यस्तरीय पुरस्कार..

नाशिक येथील निर्वाण फाउंडेशन तर्फे दरवर्षी देण्यात येणारा उत्कृष्ट शाळेचा पुरस्कार यावर्षी उत्तम कामगिरीबद्दल आर के एस स्कूल ला देण्यात आला आहे . निर्वाण फाउंडेशन नाशिक या संस्थेतर्फे दरवर्षी प्रत्येक जिल्ह्यातील उत्कृष्ट कामगिरी असणाऱ्या शाळेला हा राज्यस्तरीय सावित्री ज्योती सन्मान पुरस्कार देण्यात येतो. पुरस्काराच्या स्वरूपात सन्मानचिन्ह व सन्मानपत्र प्रधान करून गौरविण्यात येते,या करिता यवतमाळ मधील आर के एस इंग्लिश मीडियम स्कूल, राऊत नगर या शाळेला त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रामधील उत्कृष्ट कामगिरीबद्दल सावित्री ज्योती राज्यस्तरीय सन्मान देण्यात आला आहे या शाळेतील संस्थापिका विमलताई राजाभाऊ शिंदे व मुख्याध्यापक बी.एल कांबळे हे आहे .
शाळेतील संस्थापिका विमलताई राजाभाऊ शिंदे यांनी पुढील वाटचाली करीता शाळेतील सर्व शिक्षक वृंदांना शुभेच्छा दिल्या.

Copyright ©