यवतमाळ सामाजिक

मिस इंडिया रुपल मोहता यांचे हस्ते सुनिल चव्हाण सन्मानित

मिस इंडिया रुपल मोहता यांचे हस्ते सुनिल चव्हाण सन्मानित

युवभाग्य फुडस प्रोड्युसर कंपनी ढगा व डॉ मनोहर आडे मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने युवराज फुडस यांच्या पहिल्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने दी.19 नोव्हेंबर 2022 ला विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कार्य वीरांसाठी राष्ट्रीय पुरस्कार वितरण व व्याख्यान मालेचे आयोजन ऑरेंज सिटी वरूड जी. अमरावती येथे करण्यात आले होते .कार्यक्रमाचे उद्घाटक डॉ मनोहर आडे व सौ.सोनाली आडे हे होते तर अध्यक्ष पदी नितीन जी खेरडे हे होते .प्रमुख पाहुणे म्हणून दीपकजी झवर . संजय खासबागे व .सचिन देशमुख हे होते . विशेष आकर्षण व विशेष अतिथी म्हणून मिस इंडिया युनिव्हर्सल रुपल मोहता ह्या होत्या . रुपल मोहता यांचे हस्ते सुनिल रामचंद्र चव्हाण रा माळेगांव त. आर्णी जी.यवतमाळ यांना राष्ट्रीय रत्न अवॉर्ड या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले .सुनिल चव्हाण यांनी स्त्री व पुरूष च्या आवाजात गीते गाऊन रसिकांना मंत्रमुग्ध केले . या कार्यक्रमाचे आयोजन युवराज ठाकरे व सोनाली वानखेडे व नितीन ठाकरे यांनी केले होते या वेळी सभागृहात बरीच रसिक मंडळी हजर होती

Copyright ©