यवतमाळ सामाजिक

अ. भा. मारवाडी महिला संमेलनच्या वतीने आज वुमन क्रिकेट टुर्नामेंटचे आयोजन

अ. भा. मारवाडी महिला संमेलनच्या वतीने आज वुमन क्रिकेट टुर्नामेंटचे आयोजन

पुरस्कार वितरणासाठी वुमन ऑफ प्राईड डॉ. अंजली गवार्ले राहणार उपस्थित

यवतमाळ ः अखिल भारतीय मारवाडी महिला संमेलन यवतमाळच्या वतीने दि. 20 नोव्हेंबरह 2022 रोजी सकाळी 7.30 वाजता एलेव्हन स्टार ग्राऊंड वाघापूर रोड यवतमाळ येथे पहिल्यांदाच वुमन क्रिकेट टुर्नामेंट्सचे विशाल आयोजन करण्यात आले आहे. या वुमन क्रिकेट टुर्नामेंट मध्ये यवतमाळ शहरातील विविध सामाजिक संघटनांच्या जवळपास 8 चमुने सहभाग नोंदविला आहे. या स्पर्धेचे पुरस्कार वितरण सायंकाळी 4 वाजता उपविभागीय पोलीस अधिकारी संपत्रराव भोसले तर वुमन ऑफ प्राईडच्या मानकरी व गवार्ले हॉस्पीटलच्या संचालिका डॉ. अंजली गवार्ले यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होत आहे. आज होणार्‍या वुमन क्रिकेट टुर्नामेंट्स मध्ये अग्रनारी चॅम्पियन्स, सिंहझेप समर्पण सखी, रन रागिनी, माहेश्‍वरी सुपर, डेक्कन बुल्ज, डि. एम. एम. आयुर्वेद वुमन्स, कॉटनसिटी 11 महाराणी तथा अस्तित्व फाऊंडेशनसह जवळपास 8 वुमन्स क्रिकेट टिम ने सहभाग नोंदविला आहे. प्रथम पुरस्कार 5 हजार रु., द्वितीय पुरस्कार 3 हजार रु. तसेच वुमेन ऑफ सिरीज, वुमेन ऑफ मॅच, बेस्ट बैट्समॅन, बेस बोलर, बेस्ट फिल्डर तसेच सहभागी पार्टीसिपेशन प्रमाणपत्राने सन्मानित करण्यात येईल तेंव्हा यवतमाळकरांनी वुमन क्रिकेट टुर्नामेंट्सचा लाभ घ्यावा असे आवाहन अध्यक्षा पुनम जयपुरिया, सचिव उमा शर्मा, कोषाध्यक्ष काजल जयपुरिया तसेच अखिल भारतीय मारवाडी महिला संमेलन यवतमाळच्या सदस्यांनी केले आहे.

Copyright ©