यवतमाळ सामाजिक

आकाश आत्राम यांची झारखंड येथे आदिवासी समवाद कार्यक्रमामध्ये सहभाग त्यांचे गोंडी पारंपरिक वेषभूषा ठरली आकर्षक

 तालुका प्रतिनिधी/घाटंजी
अमोल नडपेलवार

आकाश आत्राम यांची झारखंड येथे आदिवासी समवाद कार्यक्रमामध्ये सहभाग त्यांचे गोंडी पारंपरिक वेषभूषा ठरली आकर्षक

घाटंजी: तालुक्यातील कुर्ली येथील आदिवासी गोंड समाजातील एक युवा नेतृत्व अत्यंत गरिबीतून त्यांनी आपले एक वर्चस्व आदिवासी समाजात निर्माण केले आहे समाजात विविध प्रकारची जनजागृती करणे आदिवासी समाजातील गोरगरिबांचे प्रश्न शासनदरबारी मांडून त्यांना न्याय मिळवून देणे शालेय विद्यार्थ्यांसाठी साठी तर अहोरात्र प्रयत्न करणारे एक खुशल व्यक्ती म्हणून ओळखले जाणारे युवक काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष आकाश आत्राम यांनी आद्यक्रांतिकारक महामानव भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंती निमित्त झारखंड राज्यातील जमशेदपूर येथे आयोजित केलेल्या आदिवासी समवाद कार्यक्रमामध्ये आकाश भाऊ आत्राम यांनी आदिवासी समाजाची पारंपारिक संस्कृती जपत वेशभूषा सादर केल्याने झारखंड राज्यात आकाश भाऊ आत्राम यांची वेशभूषा आकर्षण ठरले आहे यामुळे झारखंड राज्यातील सर्व आदिवासी समाजांनी त्यांचे मन भरून कौतुक केले आहे झारखंड राज्यातील जमशेदपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात आदिवासी समाजात उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांना या कार्यक्रमात सहभागी होता येथे याठिकाणी देश विदेशातून मोठ्या प्रमाणावर आदिवासी समाज बांधव उपस्थित राहतात यवतमाळ जिल्ह्यातुन आकाश आत्राम यांनी सहभाग घेऊन जिल्ह्याच नाव मोठे केल्याने त्यांचे जिल्ह्यात सुध्दा कौतुक केले जात आहे.

Copyright ©