Breaking News यवतमाळ

पैशाच्या लोभापायी मुलीची केल्या जाते विक्री

पैशाच्या लोभापायी मुलीची केल्या जाते विक्री

येथील स्वत: च्या परिवारांकडून यात आई वडील भाऊ यांनी दोन वर्षा पूर्वी आपल्या मुलीस एक लाख रुपये घेऊन विकण्यात आल्याची घटना यवतमाळ येथे उघडकीस आली सवी.असे की नेताजी नगर यवतमाळ येथील विजय देवराव नाडे, कासाबाई विजय नाडे आणि सून बनाबाई नाडे यांनी संगनमत करून अगोदर मुलीची एक लाख रुपये घेऊन विकण्यात आले ती २५ वर्षीय तरुणी काही दिवसातच पळून आली आणि बहिणी कडे राहू लागली,मुलगी पळून आल्याने आमचे पैसे परत मागण्या साठी त्यांनी तगादा लावल्याने पुन्हा या मुलीचा सौदा नागपूर येथे करण्यात आला हि बाब मुलीला माहीत होताच तिने शहर पोलीस स्टेशन गाठून आपबिती कथन केली हि बाब मुलीच्या आई वडिलां कळताच त्यांनी शहर पोलीस स्टेशन मधून जबराईने घरी नेऊन बेदम मारहाण करण्यात आली व गळा दाबून तिला जीव मारण्याचा प्रयत्न केला तिची प्रकृती गंभीर झाल्याने तीचेवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे.

Copyright ©