Breaking News यवतमाळ

घाटंजी येतील विद्युत वितरण कंपनीचे उपकेंद्र नगर परिषद ने केले सीलबंद

 

 तालुका प्रतिनिधी/घाटंजी
अमोल नडपेलवार

घाटंजी येतील विद्युत वितरण कंपनीचे उपकेंद्र नगर परिषद ने केले सीलबंद

विद्युत पुरवठा उपकेंद्रा कडे थकीत रक्कम २६ लाख बाकी

घाटंजी:नगर परिषदेचा कर भरणा न केल्या कारणाने वॉर्ड क्र. ६ येथील MSEB उपकेंद्र सीलबंद करण्याची कारवाई आज नगर परिषद घाटंजी मार्फत करण्यात आली. सदर उपकेंद्रावर सव्वीस लाख रुपये कर असून त्यांना त्या संदर्भात अनेक वेळा न. प. ने नोटीसा बजावलेल्या आहे. मात्र वितरण कंपनीने त्यांना ठेंगा दाखवल्यामुळे नाईलाजास्तव नगर परिषदेला कारवाई करण्यास भाग पडले या बाबत नगर परिषद कार्यालयाने वारंवार पत्र व्यवहार करून सुद्धा थकीत कराचा भरणा करण्यात आलेला नव्हता. या उलट MSEB कार्यालयाने 2 महिन्यापूर्वी नगर पालीकेची १ लाख रु. करिता विद्युत पुरवठा खंडीत केला होता. परंतु आज संबंधित कंपनीवर कार्यवाही झाल्याने त्यांच्या थकबाकीचे पितळ उघडे झाले आहे सदर सीलबंद करण्यासाठी घाटंजी नगर परिषद चे मुख्याधिकारी अमोल माळकर यांच्या मार्गदर्शनाखाली शंकर नेहारे, अनिल पाईलवार, कर अधीक्षक प्रकाश धोती, कार्यालयीन अधीक्षक, राजू घोडके पाणी पुरवठा व स्वच्छता अभियंता, नितीन हातमोडे लेखा परीक्षक, विकी शेंद्रे, प्रिया थुल, किशोर अंबुरे, सदानंद आडे व इतर नगर परिषदच्या कर्मचाऱ्यांनी सदर कार्यवाही केली तसेच मुख्याधिकारी यांनी थकीत कराचा भरणा न करणाऱ्या मालमत्तेवर याप्रकारे पुढील कार्यवाही केल्या जाईल. करिता सर्व मालमत्ता धारकांना थकीत कराचा भरणा करण्याचे जाहीर आवाहन करण्यात आले आहे .

Copyright ©