यवतमाळ सामाजिक

२५ ला यवतमाळात भव्य इनामी काटा कुस्त्यांची विराट दंगल

२५ ला यवतमाळात भव्य इनामी काटा कुस्त्यांची विराट दंगल

देशातील नामवंत मल्ल सहभागी होणार ७ लाख रुपयांची जंगी लूट

स्वातंत्र संग्राम सेनानी स्व.जवाहरलाल दर्डा यांच्या स्मृतिदिनी २५ नोव्हेंबर रोजी इनामी काटा कुस्त्यांची भव्य दंगल आयोजित करण्यात आली आहे. यवतमाळ जिल्हा कुस्तीगीर संघाच्या वतीने ७ लाख रुपयांची बक्षिसे असलेली ही दंगल ऐतिहासिक हनुमान आखाडाच्या प्रांगणात सुरू होणार असल्याची माहिती जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर यांनी दिली.

तसेच माजी खासदार विजय दर्डा, माजी आमदार कीर्ती गांधी, लोकमतचे जिल्हाप्रमुख किशोर दर्डा यांच्या मार्गदर्शनात ही स्पर्धा दरवर्षी आयोजित केली जाते.या दंगलीत देशातील नामवंत मल्ल हजेरी लावतात आयोजकाच्या वतीने श्री हनुमान आखाड्याच्या दिवंगत कुस्तीगिरांच्या स्मरणार्थ मोठ्या प्रमाणात बक्षीस ठेवण्यात आली आहे.

पहिले बक्षीस ५१ हजार रुपये दिवंगत सुभाषदादा बाजोरिया यांच्या स्मरणार्थ प्रशांत बाजोरिया यांच्याकडून दिले जाणार आहे. दुसरे बक्षीस ४१ हजार रुपये जनता नागरी सह पतसंस्थेचे अध्यक्ष अनिल दंडे यांच्यातर्फे तर तिसरे बक्षीस गोदावरी अर्बन मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी नांदेड यांच्यातर्फे दिले जाणार आहे. तसेच चवथे बक्षीस यवतमाळ जिल्हा मजूर कामगार संस्थांचे अध्यक्ष विलास महाजन यांचेकडून आणि पाचवे बक्षीस २१ हजार रुपये विजय डांगे व धनंजय भगत यांच्यावतीने दिले जाणार आहे.

सहावे बक्षीस १५ हजार स्व.अशोकराव गुल्हाने यांच्या स्मरणार्थ शैलेश भाऊ गुल्हाने यांच्याकडून सातवे बक्षीस १० हजार रुपये दिवंगत दिनेश गिरोलकर यांच्या स्मरणार्थ आर.बी कंट्रक्शन यांच्यातर्फे, आठवे बक्षीस ७ हजार रुपये दिवंगत शिवदासराव लोखंडे यांच्या स्मरणार्थ अविनाश लोखंडे यांच्यातर्फे, नववे बक्षीस ५ हजार मकसूद भाई समीर इंटरप्राईजेस यांच्यातर्फे, दहावे बक्षीस ३ हजार रुपये स्व. गजाननराव उजवणे यांच्या स्मरणार्थ प्रशांत उजवणे यांच्यातर्फे, अकरावे बक्षीस २ हजार स्व.पुरुषोत्तम जयसिंगपूरे यांच्या स्मरणार्थ सुरेश जयसिंगपुरे यांच्यातर्फे, बारावे बक्षीस १ हजार रुपये स्व.महम्मद शफी पैलवान यांच्या स्मरणार्थ शकील पैलवान यांच्यातर्फे दिले जाणार आहे. यासोबत कुस्त्यांच्या अखंड जोड लावून रोख १००, २००, ३००,४००,५०० रुपयांची बक्षीस दिली जाणार आहे.

या कुस्तीच्या दंगली स्पर्धेत व प्रेक्षकांना प्रवेश निशुल्क आहे.इनामी काटा कुस्त्यांच्या दंगलीत मल्लांनी सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर, कार्याध्यक्ष प्रभाकर गटलेवार, सचिव अनिल पांडे, उपाध्यक्ष कुलभूषण तिवारी, संघटक प्रतापभाऊ पारसकर, कोषाध्यक्ष अनंतराव जोशी, सहसचिव सुरेश जयसिंगपुरे यांनी केले आहे.

Copyright ©