यवतमाळ सामाजिक

सावळी सदोबा येथे बीरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी,

सावळी सदोबा येथे बीरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी,

सावळी सदोबा येथे
क्रांतिवीर बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले, तसेच गावातील सर्व महापुरुषांच्या पुतळा व प्रतिमेला हार अर्पण करण्यात आले.
या कार्यक्रमा करिता प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आदिवासी सेलचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार राजूभाऊ तोडसाम, माजी जी.प.उपाध्यक्ष मुबारक तंवर, गणपत पाटील जगताप , किसन नाईक चव्हाण,
विलास गेडाम, सावळी सदोबा गावच्या माजी सरपंच अंजनाताई गेडाम , सोनबा मंगाम, देवानंद राठोड,विजय समगिर होते.
गावात वाजत गाजत भव्य मिरवणूक काढण्यात आली.
या वेळी गावातील
नागरिकांनी उत्सफूर्तपणे सहभाग घेतला.
यावेळी मारोती गेडाम,अशु मेश्राम, अनिल मडावी, अविनाश मडावी, दादाराव कुरसंगे , संतोष गेडाम, सुखदेव मडावी, मारोती गेडाम, भिमराव दडांजे , विनोद दडांजे व गावकरी उपस्थित होते.

Copyright ©