यवतमाळ राजकीय

प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्राचे उद्घाटन संपन्न

प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्राचे उद्घाटन संपन्न

रक्तचे पाणी करुन जगातील समस्त जनतेचे पोट भरण्याचे काम शेतकरी बांधव करित आहे – आ. मदन येरावार

यवतमाळ ः रसायन व खत मंत्रालय भारत सरकार व कृषक भारती को. ऑप. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्राचा उद्घाटन सोहळा व कृषि मेळावा दि. 15 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 वाजता वैभव ऍग्रो एजन्सी दत्त चौक येथे लोकप्रिय आ. मदन येरावार यांच्या शुभहस्ते जिल्हा कृषि अधीक्षक एन. एम. कोडपकर, कृषि विकास अधिकारी राजेंद्र माळोदे, डीजीएम कृभको मुंबई व्ही. एम. मोहरीर, क्षेत्र व्यवस्थापक, कृभको नागपूर बी. एस. चव्हाण यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
आपल्या उद्घाटनपर भाषणात बोलतांना लोकप्रिय आ. मदन येरावार म्हणाले की, रक्ताचे पाणी करुन जगातील समस्त जनतेचे पोट भरण्याचे काम शेतकरी बांधव करित आहे. उंच इमारती, मोठ मोठे विमानतळ, अडाणी, अंबानी, फोर्बच्या यादीत असले तरी जो पर्यंत सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, वैचारिक दृष्ट्या समाज घडत नाही तो पर्यंत भारत विकसित झाला असे म्हणता येणार नाही असे आ. मदन येरावार यांनी प्रभावीपणे उपस्थित शेतकर्‍यांना पटवून सांगितले. पुढे बोलतांना ते म्हणाले की, कृषि केंद्राचा मालक हा शेतकर्‍यांचा डॉक्टर आहे, तो सांगतो तसेच शेतकरी आपल्या शेतात पेरणी करतो, ग्लोबल वार्मिंग, संपूर्ण जागत आहे. त्याचा उपाय जग शोधत आहे. देशातील शेतकरी धन धान्याने समृद्ध झाला असून 25 देशाला आपला भारत देश अन्न धान्य पुरवित आहे ही अभिमानाची बाब आहे. जो पर्यंत शेतकरी समृद्ध होत नाही तो पर्यंत भारत विकसित व विश्‍व गुरु होणार नाही असे ही ते म्हणाले.
या प्रसंगी कोळमकर साहेब, माळोदे साहेब, शिवा जाधव, बर्डे साहेब, प्रछीप ओमनवार, फाळके साहेब, राजगुरु साहेब, महाबीजचे ठाकरे साहेब, गांवडे साहेब, अभय राऊत, दिलीप बोगावार, पंकज चिंतावार, ब्ल्यु डायमंड ट्रान्सपोर्टचे आमीन सेठ केराणी आदि प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचलन एरिया मॅनेजर कृभको नागपूर चे चव्हाण यांनी तर प्रास्ताविक नीरज रांहाडाळे तर आभार प्रदशन मोहित साहेब यांनी केले. या प्रसंगी मोठ्या संख्येने शेतकरी बांधव, कृषि मित्र, व्यापारी बांधव उपस्थित होते.

Copyright ©