यवतमाळ सामाजिक

क्रांतिवीर बिरसा मुंडा जयंती उत्सव समिती , यांच्या वतीने बिरसा पर्व व भव्य मिरवणुकीचे आयोजन

क्रांतिवीर बिरसा मुंडा जयंती उत्सव समिती , यांच्या वतीने बिरसा पर्व व भव्य मिरवणुकीचे आयोजन क्रांतिवीर बिरसा मुंडा जयंती उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
15 ऑगस्ट 1947 पूर्वी आपली मायभूमी परकीयांच्या गुलामीत होती. त्यांनी सांगावे व आपण ऐकावे असे चालले होते. निसर्गदत्त स्वातंत्र्यावर पुंडपुरोतांनी घाला घातला होता. परकीयांच्या जोखडात भारत माता बंदिस्त होती. परकीयांच्या जोखंडातून मायभूमीला स्वतंत्र करण्यासाठी जीव मुठीत घेऊन इट का जबाब पत्थर से देने वाले अनेक मनगटवादी क्रांतीवीर निघाले होते. काही मनगटवादी क्रांतिवीर शस्त्राने तर काही बुद्धिवादी अस्त्राने लढले. मंडळातील क्रांतिवीर बिरसा मुंडा हे एक वादळ होतं ज्यांनी आपल्या क्रांतिकार्यातून परकीयांना सळो की पळो करून सोडले होते. या निधड्या छातीच्या क्रांतीवीरांचा इतिहास, त्यांचे समर्पण, केलेला त्याग, प्रत्येक समाज बांधवांनी स्मरणात ठेऊन कार्य चालू ठेवावे थोर क्रांतिकारक स्वातंत्र्य सेनानी, युगप्रवर्तक विभूती यांचे जीवन कार्य हे दीपस्तंभा प्रमाणे असते तो दृष्टिकोन समोर ठेवून मुलांना शिक्षण देणे काळाची गरज असल्याचे उद्घाटक शासकीय आश्रम शाळेचे प्राचार्य शेलेंद्र मिश्रा यांनी केले या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष चित्रपट निर्माते अनिल धकाते, शेणमारे यांनी इतिहासातील अनमोल क्षण बिर्सा मुंडा विषयी विषद केले या कार्यक्रमास प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकिय अधिकारी डॉ.सायली बनसोड , जी. प.शाळेच्या मुख्याध्यापिका नम्रता राऊत, बेबीताई पट्टे,ज.का. स.चे अध्यक्ष अंबादास कुमरे, .क्षेत्रासाय्यक एस. एस.आकरे, पो.पा. दीगांबर शहारे, उपसरंचप अभिजित मूरखे,भोई समाजाचे अध्यक्ष नारायण अवझाडे, नामदेराव मडावी, वसंतराव कोहचाडे,गुणवंत कोडपे, लक्ष्मण मेश्राम,मंडळाचे अध्यक्ष रामप्रसाद मडावी,मोहन सिडाम,सोहन कोडापे,मारोती आत्राम, गौरव मडावी,आश्विन कुमरे,अतुल कुडमते प्रवीण कुमारे,बेबी मडावी,लीलाबाई मेश्राम,पुष्पाबाई मेश्राम इत्यादि प्रामुख्याने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ओंकार चेके यांनी केले तर आभार ओंकार कूमरे यांनी मानले.

Copyright ©