Breaking News यवतमाळ राजकीय

*गावपातळीवर चोवीस तास विद्युत पुरवठा द्या* आ.*मदनभाऊ येरावार*

 

आज विद्युत महावितरण कंपनीच्या विशेष बैठकीत आ.मदनभाऊ येरावार यांनी यवतमाळ मतदार संघातील गावे यवतमाळ ग्रामीण सबस्टेशनाल जोडून घ्यावी तर शेतकऱ्यांना नियमित आठ तास विद्युत पुरवठा मिळेल याची व्यवस्था करावी त्या काळात ब्रेक डाऊन,विद्युत पुरवठा होऊ शकला नाही तर तो वेळ शेतकऱ्यांना पुढील वेळ वाढून देण्यात यावा हा महत्व पूर्ण निर्णय घेण्यात आला विशेष म्हणजे गावठाण येथील विद्युत देयक थकल्यास विद्युत पुरवठा बंद करन्यात येऊ नये असे आदेश आज झालेल्या महावितरण कंपनीच्या विशेष बैठकीत देण्यात आले तर
हिवरी व रुई सर्कल मधील जवळपास पंधरा गावे जुळून आहे हि गावे आर्णी येथे जोडण्यात आले होते आर्णी हे संबसेंट्टर दारव्हा येथे जोडण्यात आले होते या परिसरातील हजारो ग्राहकांना याचा मोठा फटका बसणार हि बाब लक्षात येताच हिवरी रुई सर्कल ला आता यवतमाळ ग्रामीण ला जोडण्यात येणार असल्याने हीवरी,रुई सर्कल ला मोठा दिलासा मिळाला आहे आज झालेल्या विशेष बैठकीत आ.मदनभाऊ येरावार यांनी संबधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले ,तर ट्रान्सफॉर्मर जळाल्यास ४८ तासात दुसरे ट्रान्सफॉर्म देण्यात यावे जेणे करून शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागणार नाही,ज्या डीप्या उघड्या आहे त्या त्वरित दुरुस्ती करा जेथे नवीन बसविण्याची आवश्यकता आहे तेथे नवीन बसविण्यात याव्या, ज्या शेतकऱ्यांचे थकीत विजबिलाचां पन्नास टक्के भरणा करून सोलर कनेक्शनची परवानगी देण्यात यावी तर्तालुक्यातील रुलर विद्युत मंडळाचे सब स्टेशन बाभुळगाव,जोडमोहा,आर्णी या तिन्ही सबस्टेशनला पर्याय म्हणून,यवतमाळ ग्रामीण सब स्टेशन निर्माण करण्यात यावे असे आदेश या वेळी देण्यात आल्याने यवतमाळ तालुक्यातील शेतकऱ्याना व सर्व सामान्यांना मोठा दिलासा मिळनार आहे,या वेळी शामभाऊ जयस्वाल,अधिक्षक अभियंता सुरेश मडावी,कार्यकारी अभियंता विनोद मालवी,संजय खंदार का का.अभियंता दारव्हा विभाग,प्रफुल फुलझेले उप कार्य.अभियंता ग्रामीण,कांबळे उप. का.अभी.शहर विभाग,राठोड उप.का.अभी,दारव्हा विभाग, इत्यादि या वेळी प्रामुख्याने उपस्थित होते.

Copyright ©