यवतमाळ सामाजिक

बालकांनी शैक्षणिक प्रगती कडे लक्ष द्यावे – जिल्हाधिकारी अमोल येडगे

बालकांनी शैक्षणिक प्रगती कडे लक्ष द्यावे – जिल्हाधिकारी अमोल येडगे

देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्म दिवस १४ नोव्हेंबर बाल दिन म्हणून साजरा करण्यात येतो. पंडीत नेहरुना लहान मुले खूप आवडत, मुले त्यांना आवडीने चाचा नेहरू म्हणून संबोधित असत. यवतमाळ जिल्ह्यात मा. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी जिल्ह्यात कोविड मुळे अनाथ झालेली १२ बालके व काळजी व संरक्षणाची गरज असलेली शासकीय निरीक्षण गृह यवतमाळ, अशोक बाल गृह वटफळी व सुमनताई बालगृह राळेगाव या २ स्वयंसेवी संस्थेतील बालकांना बालदिनाचे औचित्य साधून महसूल भवन जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ येथे बालकांशी संवाद साधून बालकांच्या अडी अडचणी/समस्या जाणून घेतल्या. बालकांना बालदिनानिमित्य शैक्षणिक साहित्य भेटवस्तु, पुष्पगुच्छ देवून आगळ्या वेगळ्या पद्धतीने बालदिनाच्या शुभेच्छा दिल्या.
पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या फोटोस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या प्रसंगी बोलतांना मा. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी जिल्ह्यात कोविडमुळे अनाथ झालेल्या बालकांनी शासनाकडून प्राप्त अर्थसहाय्याचा उपयोग शैक्षणिक प्रगतीसाठी करावा. आपल्या काही अडी अडचणी असल्यास आम्हाला सांगाव्या, शासन आपले पालक म्हणून सदैव आपल्या पाठीशी उभे आहे. असे प्रतिपादन करून काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या बालकांनी आपल्या जीवनात अधिकारी, डॉक्टर, इंजिनिअर, वकील होण्याचे मोठे स्वप्न बाळगावे संस्था व प्रशासनाचे वतीने बालकांच्या शैक्षणिक विकासासाठी सदैव पुढाकार घेतला जाईल. असे प्रतिपादन या प्रसंगी त्यांनी केले. तसेच बाल कामगार प्रतिबंध सप्ताहाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन या प्रसंगी त्यांनी केले.
या प्रसंगी दुबे साहेब अप्पर जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे, प्रशांत भोयर उपमुख्य कार्यकारी अधिकारी (प्रशा.) जि.प. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी ज्योती कडू, जिल्हा माहिती अधिकारी मनीषा साळवे, सरकारी कामगार अधिकारी प्र. रा. महाले, र. श. जतकर दुकाने निरीक्षक , वि. पा. गुल्हाने, बाल कल्याण समिती अध्यक्ष वासुदेव डायरे, सदस्या अॅड. प्राची निलावार, वनिता शिरफुले, अॅड. लीना आदे, बाल न्याय मंडळ सदस्या अॅड. काजल कावरे, जिल्हा नाझर, जि.प.अ.रवींद्र गजभिये, शासकीय बालगृह अधीक्षक गजानन जुमळे, समुपदेशिका पूजा राठोड, शिक्षक संजय मोटे, वटफळी, राळेगांव बालगृहाचे अधीक्षक/कर्मचारी वर्ग उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्योती कडू तर संचलन देवेंद राजूरकर यांनी केले. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, सखी वन स्टॉप सेंटरचे सर्व अधिकारी/कर्मचारी व जिल्हा प्रशासन यांनी कार्यक्रम यशस्वितेसाठी अथक परिश्रम घेतले. कार्याकामाकरीता कोविड मधील अनाथ बालकाचे पालक, संस्थेतील बालके इतर अधिकारी कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Copyright ©