Breaking News राजकीय

चित्राचा – विचित्र प्रकार, पत्रकारांसोबत असभ्य वर्तन

चित्राचा – विचित्र प्रकार, पत्रकारांसोबत असभ्य वर्तन

(भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्षा सौ. चित्रा किशोर वाघ यांचा राळेगाव तालुका पत्रकार संघाचे वतीने तीव्र निषेध)

सौ. चित्रा किशोर वाघ ह्या भारतीय जनता पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा झाल्यानंतर प्रथमच विदर्भ दौऱ्यावर यवतमाळ येथे आल्या असता शिंदे-फडणवीस सरकारने १०० दिवसात महिलांकरीता केलेल्या महत्वपूर्ण कामाची माहिती देणेकरिता पत्रकार परिषदेचे आयोजन केले. यावेळी इंग्रजी माध्यमा चे प्रतिनिधी टी. ओ. अब्राहम यांनी पुजा चव्हाण बाबत प्रश्न विचारल्याने सौ. चित्रा किशोर वाघ एकदम भडकल्या आणि तुम्ही मला प्रश्न विचारणारे कोण ? तुम्ही न्यायालय आहेत का ? अश्या पत्रकारांना पत्रकार परिषदेत बोलवू नका असे बेताल वक्तव्य केले, पत्रकार परिषद स्वतः आयोजित करायची आणि पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देण्याऐवजी तुम्ही मला प्रश्न विचारणारे कोण असं वक्तव्य चित्रा वाघ यांनी केले. त्यांच्या या वागणुकीने एक प्रकारे लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाची मुस्कटदाबी करण्याचाचं निंदनीय प्रकार घडला असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.
या घटनेचा स्व. पी. एल. शिरसाट राळेगाव तालुका पत्रकार संघटनेचे अध्यक्ष राजेश काळे, सचिव फिरोज लाखाणी, उपाध्यक्ष दिपक पवार, उपाध्यक्ष विशाल मासुरकर, कोषाध्यक्ष रितेश भोंगाडे, जेष्ठ पत्रकार सदस्य प्रकाश मेहता, डॉ. के. एस. वर्मा, महेश शेंडे, अशोक पिंपरे, मोहन देशमुख, राष्ट्रपाल भोंगाडे, मंगेश राऊत, महेश भोयर, विनोद चिरडे, संजय दुरबुडे, गुड्डू मेहता, प्रमोद गवारकर, मंगेश चवरडोल, रामू भोयर, राजू काळे, गजानन तुमराम, मनोहर बोभाटे, सचिन राडे, शालिक पाल, विलास साखरकर, रणजीत परचाके, जावेद पठाण, शंकर वरघट, शैलेश आडे, आशिष मडकाम, गजेंद्रकुमार ठुणे, प्रविण गायकवाड, विनोद माहुरे, संदीप लोहकरे, धिरज खेडकर, श्रीकांत कवाडे, अरविंद तेलंगे, गणेश गौळकार, शंकर जोगी, दिनेश सराटे, अजीज शेख सह सर्व पत्रकार बांधवांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे.

Copyright ©