यवतमाळ सामाजिक

निर्भयतापूर्वक मृत्यूला सामोरे जाण्यासाठी ईश्‍वराशी जवळीक साधावी – चिदंबरानंद महाराज

निर्भयतापूर्वक मृत्यूला सामोरे जाण्यासाठी ईश्‍वराशी जवळीक साधावी – चिदंबरानंद महाराज

यवतमाळ – परिक्षित राजांनी शुकदेवजी महाराजांचे पूजन व यथायोग सत्कार केला. भागवत कथा सांगण्यास शुकदेवजी व आलेल्या ईतर सर्व ऋषीमुनींना एकच प्रश्‍न विचारला की, ज्यांची मृत्यू येत आहे, त्यांनी काय करावयास हवे? शुकदेवजींनी यासाठी परिक्षिताची प्रशंसा केली आणि सांगितले की, मृत्यू अटल व शाश्‍वत सत्य आहे, ज्याचा जन्म होईल त्याचा अंत होणारच! मग त्याचा भग का असावा? आणि चिंता किंवा भग ठेवले तर मृत्यू थोडे ठरणार आहे? यम यास एक दिवस आवळला जाईलच.
भारतीयांची संस्कृती कधीही मृत्यूला सहर्ष सामोरे जाण्याची आहे. शुकदेवजी म्हणाले की राजन मी या प्रश्‍नांचे उत्तर ज्याचा सर्वांना उपयोग होईल, सर्व जगातील प्रत्येकाला उपयोगी होईल असे देत आहो.
येथील नवजीवन मंगल कार्यालयात यवतमाळातील रामस्वरुप भूत परिवारद्वारा श्रीमद्भागवत कथा सत्र सुरु आहे. आज शुक्रवारी दिनांक 11 नोव्हेंबरला व्यासपीठावरुन कथा अनंत श्री विभूषीत महामंडलेश्वर, स्वामी चिदंबरानंदजी, शुकदेव परिक्षित संवादाचा प्रसंग सांगत होते.
भारतातील राम, कृष्ण, सर्वच महापुरुष, संत यांनी हसतच मृत्यूला सामोरे गेले. मृत्यू सर्वांची येणारच आहे, पण अंतिम समयी भागवत स्मरण केले पाहिजे ईश्वराचे स्मरण केले पाहिजे. आपला शेवट अगदी आनंदाने व निर्भयतापूर्वक व्हावा म्हणून जीवनात चांगले कर्म, संतांची सेवा व लोकोपयोगी कामे केली पाहिजे, धर्म, अर्थ काम मोक्ष व्यवस्थीत करतांना स्वत:स आयुष्यभर ईश्वरांशी जोडले पाहिजे. कथेच्या प्रारंभी भागवत ग्रंथांचे पूजन रामस्वरुप भूत, रमेश चंद्र भूत व प्रकाशजी चोपडा यांनी केले.

Copyright ©