यवतमाळ सामाजिक

डॉ. अंजली गवार्ले वुमन ऑफ प्राईडच्या ट्राफीने सन्मानित

डॉ. अंजली गवार्ले वुमन ऑफ प्राईडच्या ट्राफीने सन्मानित

यवतमाळ – 9 नोव्हेंबर मुंबई हॉटेल रेडीसन इंटरनॅशनल ग्लॅम अवॉर्ड चा कार्यक्रम पार पडला. यामध्ये मिस मिसेस इंटरनॅशनल ही स्पर्धा आयोजित करण्यात आली. तसेच हेल्थ केअर, वेलनेस बिजनेस, वुमन इम्पोरियर असे अवॉर्ड प्रदान करून विविध क्षेत्रातील उत्तम कार्य करण्याच्या स्त्रियांचा सन्मान करण्यात आला. देश व विदेशातून बांगलादेश, मलेशिया असे विदेशातील 33 स्पर्धक या स्पर्धांमध्ये सहभागी होते. यवतमाळतील सुप्रसिद्ध डॉ. अंजली गवार्ले यांना वुमन ऑफ प्राइड या ट्रॉफीने हेल्थ केअर अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. तसेच अभिनेत्री अमिषा पटेल यांनी डॉ. अंजली गवार्ले यांना मानाचे मुकुट प्रदान केले. गवार्ले हॉस्पिटल यवतमाळच्या संचालक डॉ. अंजली गवार्ले आहेत. मेडिकल क्षेत्रातील विविध सामाजिक कार्यामध्ये त्यांचा सहभाग असतो. तसेच मेडिकल हेल्थ वेलनेस आणि वैद्यकीय क्षेत्रात त्यांना यापूर्वीही आयुर्वेद गौरव पुरस्कार, स्त्रीरत्न पुरस्कार, वर्ल्डकॉन, महाराष्ट्र आयडल इत्यादी अनेक पुरस्काराने सन्मानित केले आहे. त्यांच्या या यशाबद्दल यवतमाळ येथे त्यांचा सर्वत्र कौतुक होत आहे या यशाचे श्रेय त्यांच्या परिवाराला देतात. तसेच इंटरनॅशनल ग्लॅम आयकॉन मेडिकल अवॉर्डसाठी त्या ऑर्गनायझर सुनिता भट्ट, डॉ. वर्तीका पाटील, डॉ. चेतना अग्रवाल, डॉ. समता चौधरी, फरहान अक्तर, अरुनिया पांचाल यांचे सहकार्य लाभले.या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अभिनेत्री अमिषा पटेल व सहरीअर सेपोन बांगलादेश ऍक्टर आयफा अवॉर्ड ब्रँड अँबेसिडर होते. परीक्षक डॉ. रेणू अग्रवाल, सुचिता सिंग, दीपा मारुक, निराली पांड्या, सलविस्टा के प्रियांका मोरे लाभल्या होत्या. डिझायनर पौर्णिमा गोळे व ज्वाला फॅशन या होत्या फोटोग्राफी पोर्ट पोलिओ शुटिंग भूषण गांधी यांनी केले. संचवालन पूजा भगत यांनी केले.

Copyright ©