यवतमाळ सामाजिक

विविध उपक्रमातून पारवा सरपंचा संगीताताई मडावी यांचा वाढदिवस साजरा

तालुका प्रतिनिधी/घाटंजी
अमोल नडपेलवार

विविध उपक्रमातून पारवा सरपंचा संगीताताई मडावी यांचा वाढदिवस साजरा

घाटंजी – तालुक्यातील पारवा ग्राम पंचायतीच्या सरपंचा सौ.संगीताताई देवराव मडावी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पारवा येथे दिनांक १०ऑक्टोबर रोजी विविध उपक्रमाचे आयोजन करून त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
वाढदिवस हा प्रत्येकाच्या एक आनंदाचा दिवस तो समाजिक बांधिलकीतून सत्कर्मी लागावा हा उदांत हेतू पुढे ठेवून पारवा येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर,शालेय विध्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप व ग्राम पंचायत कार्यालय परिसरात बहुसंख्य मान्यवरांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करून मोठ्या उत्साहात हा वाढदिवस एक ग्राम पंचायत स्तरावर साजरा करण्यात आला. यानिमित्ताने ग्राम पंचायत कार्यालय,शाळेत केक कापून,सरपंचा संगीताताई मडावी यांना केक भरविण्यात आले.याच सोबत त्यांचेवर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला यात त्या पूर्णता भारावून जात सर्वांचे मनापासून आभार मानले विविध ठिकाणी संपन्न झालेल्या कार्यक्रमात इंझाळा ग्राम पंचायत चे सरपंच वैयजंती ठाकरे,पारवा ग्राम पंचायत चे सदस्य बालाजी पोटपेल्लिवार,राजू दवणे,नागोराव शेडमाके, बेबीताई कोरवते,अजय घोडाम, मुख्याध्यापिका गीता मानकर,परशुराम पराचे, उज्वला ठमके,बबिता काटोटे, राजू कोवे,विनोद उरवते, राजू ठमके समाजिक कार्यकर्ते गणेश मुद्दलवार, ग्राम पंचायत कर्मचारी यांचे सह बहुसंख्य ग्रामस्थ यांची उपस्थिती लाभली.

Copyright ©