यवतमाळ राजकीय

महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांना बडतर्फ करा; राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

तालुका प्रतिनिधी अमोल नडपेलवार/घाटंजी

महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांना बडतर्फ करा; राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

घाटंजी:महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांना बडतर्फ करून फौजदारी कार्यवाही करा या मागणीसाठी आज तालुका राष्ट्रवादी काँग्रेस तालुका राष्ट्रवादी आदिवासी सेल च्या वतीने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना तहसीलदार घाटंजी मार्फत निवेदन देण्यात आले. आज शेतकरी संकटात आहे, राज्यावर ओल्या दुष्काळाचे सावट आहे, सरकार मधले मंत्री बेताल वक्तव्य करीत आहे. त्यातच अब्दुल सत्तार यांनी तर सुप्रियाताई सुळे यांच्यावर पातळी सोडून टीका केली आहे. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर हे राज्यकर्ते राज्य करतात तर कमीतकमी शिवाजी महाराज यांचे स्त्रियांच्या बाबत धोरण काय होते, हे तरी लक्षात घ्यायला हवे. संसदरत्न असलेल्या सुप्रियाताई सुळे यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करावी हे अतिशय दुर्भाग्यपुर्ण आहे. यावेळी निवेदन देताना तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मोरेश्वर वातीले राष्ट्रवादी आदिवासी सेलचे तालुका अध्यक्ष बंडू तोडसाम, आशिष माडूरवार, चित्रपट कला व सांस्कृतिक विभाग महाराष्ट्र सचिव ,रीतेश बोबडे,सै जावेद सै अमीर अल्पसंख्या तालुका अध्यक्ष घाटंजी, संजय ढगले ,विनय जाधव कृष्णा पेडंपवार ,विनोद प्रधान रमेश सिडाम तालुका आदिवासी सेल सरचिटणीस राजेंद्र मडावी ,काशीराम कुलसंगे ,मारुती कोटनाके बळीराम कुडमते ,विजय रंदये, विराज निवल ,अमोल गेडाम , उपस्थित होते

Copyright ©