यवतमाळ सामाजिक

सत्संग, संत सेवा व संस्कारानेच मानवजन्माचे सार्थक असल्याची भागवतची शिकवण – स्वामी चिदंबरमजी महाराज

सत्संग, संत सेवा व संस्कारानेच मानवजन्माचे सार्थक असल्याची भागवतची शिकवण – स्वामी चिदंबरमजी महाराज

यवतमाळ – भागवत पुराण पठण किंवा श्रवणाने सर्व लौकीक अभिलाषा पूर्ण होतील, सर्व मनासारखे घडेल असे नसते, मात्र मनुष्य आपल्या जवळ आहे त्याचे दु:ख करत बसतो. पण आज सर्व सुखी जगात कोण आहे. याचा करुन जीवन योगक्षेम समजून वाटचाल केली तरच भागवत श्रवणाचे सार्थक होते. कथा हि महात्म्यांशी आपणास जोडणारी आहे. सत्संग, संतसेवा व योग्य संस्कारानेच नरजन्माचे सार्थक होते. हेच शस्त्राची शिकवण असल्याचे प्रतिपादन अनंत श्री विभूषित महामंडलेश्‍वर स्वामी चिदंबरानंद महाराज यांनी केले. ते स्थानीय नवजीवन मंगल कार्यालयात येथील भूत परिवार द्वारा आयोजित भागवत कथा पर्वान द्वितीय पुष्प गुंफत होते. भागवत कथामृताचे पान करतांना त्याचे मर्म कळेलच असे हि नाही, मात्र श्रवण भक्तीनेहि जे उद्बोधन होते ते मोलाचे असते. स्वामीजींनी देवर्षी नारदाच्या पूर्वजन्माचे आख्यान व शुकदेवांच्या आगमनाचा प्रसंग व परिक्षित राजांना भागवत कथा ऐकविली.
सत्कर्म व सद्विचारामुळे फलश्रुती कशी होते. हे स्वामिजींनी दुर्बुध्दी व आत्मदेव दम्पतीच्या चरित्रावरुन सांगितले. तुंगभद्रा नदीच्या काठावरील एका गावी एक आत्मदेव नावाचा ब्राम्हण आपल्या पत्नी सोबत राहत होता, आत्मदेव स्वत: विद्वान निती संपन्न संस्कारवान होते. तर पत्नी मात्र भिन्न स्वभावाची होती, फक्त त्यांना संतती होत नव्हती. एवढेच त्यांना दु:ख होते. त्या निराशेत ते आत्महत्या करण्यास निघाले, पण त्यांचे कर्म चांगले असल्याने एक महात्माजी भेटले, त्यांनी विचारल्यावर ब्राम्हणाने सांगितले की, स्वामीनी आपण सर्वज्ञ आहात आपणास सर्व विदितच आहे की, मला पुत्र प्राप्त नाही, मी पाळलेल्या गाईस ही वासरी होत नाही व लावलेल्या वृक्षांना फळं फुलं येत नाही, म्हणून आता जीवन नकोसे झाले आहे.
महात्माजी म्हणाले की, संतती सुखासाठी आत्महत्या करत आहे, पण तुला पुढील सात जन्मात हि पुत्र प्राप्तीचा योग आहे. पुत्र लालसेपेक्षा तु आत्मकल्याण व जीवन उध्दाराकडे लक्ष दे. त्याला पत्नीस खाण्यासाठी फळ दिले. आत्मदेवाच्या पत्नीने मात्र अव्हेर करुन गाईला दिले. गाईला दिल्यामुळे गाईसारखे कान असणारा मात्र नररुपात बालक जन्माला आला. त्याचे नांव गोकर्ण ठेवण्यात आले. पण दुसरा पुत्र दुदुंबी अभद्र व दुराचारी निघाला. गोकर्ण पित्याप्रमाणे संस्कारक्षम, विद्वान निघाला. शेवटी मुलं कसे निघतील हे माता-पित्यांकडून मिळालेल्या संस्कारावर निभर असते.

About the author

Patrakar Shakti

Add Comment

Click here to post a comment

Copyright ©