यवतमाळ सामाजिक

यवतमाळ नगरीत भागवत कथा सप्ताहाचा आरंभ रामजन्मभूमी मुक्तीदिनी

यवतमाळ नगरीत भागवत कथा सप्ताहाचा आरंभ रामजन्मभूमी मुक्तीदिनी

यवतमाळ – दु:ख व सु:ख दोन्ही राहणारच आहे. ज्याप्रमाणे रात्र व दिवस आवश्यक आहे. कलयुग देखील आपणा सर्वांना सहन करावयाचा आहे. पण त्यापासून पलायन न करता त्यावर उपाय करणे मानसाच्या हातात आहे. आणि कलयुगात नामस्मरणाने सर्व नकारात्मक बाबी दुर होतात असे नारदाने भक्तीस सांगितले होते. भक्ती वृंदावन येथे आपले जर्जर झालेले पुत्र ज्ञान व वैराग्य यांना घेवून वृंदावनात होती. भागवत कथेने उद्बोधन मिळते. असे प्रतिपादन भूत परिवाराद्वारा आयोजित श्री भागवत कथा ज्ञान यज्ञ अनंत श्री विभुषीत महामंडळेश्‍वर स्वामी चिदंबरम सरस्वतीजी महाराज यांनी केले. आज दिवशी भागवत व त्यात येणार्‍या चारीत्र्यांची महिला स्वामीजींनी कथन केले. स्वामीनी म्हणाले की, यवतमाळ शहरात आजपासून कथा सुरु झाली. आज 9 नोव्हेंबर हा एैतिहासीक दिवस आहे. आजच्याच दिवशी 2019 मध्ये वर्षानुवर्षे न्यायालयात प्रलंबित रामजन्मभुमीच्या सर्वोच्च न्यायालयाचा निकाल झाला होता. व मंदिर निर्माण चा मार्ग सुकर झाला होता. यवतमाळ येथील रामस्वरुप व सौ. सिमादेवी भूत यांनी जनकल्यानार्थ भागवत कथेचे आयेाजन केले असून या भागवत कथा सप्ताहानिमित्त गोवर्धन नाथ हवेली येथून भव्य रथयात्रा निघाली त्यात पारंपारीत राजस्थानी वेशभूषेत धर्मध्वजा घेवून पुरुष तर कलश घेवून महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. या शोभायात्रेमध्ये विशेष आकर्षण वारकरी दिंडीची भजने ठरली. तर या शोभायात्रेमध्ये राणीसती दादी परीवार, शामबाबा परिवार, खपते महाराज भक्त मंडळ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. हे कथापर्व 15 नोव्हेंबरपर्यंत सुरु राहणार असून कथेची वेळ दुपारी 2.30 वाजतापासून असून भावीक भक्तांनी या कथापर्वाचा लाभ घ्यावा असे आवाहन भूत परिवाराचा लाभ केला आहे.

About the author

Patrakar Shakti

Add Comment

Click here to post a comment

Copyright ©