यवतमाळ सामाजिक

बालकांनी शिक्षण हक्क कायद्याचा लाभ घ्यावा- न्या.सुप्रिया लाड

बालकांनी शिक्षण हक्क कायद्याचा लाभ घ्यावा- न्या.सुप्रिया लाड

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यवतमाळ व बाल न्याय मंडळ यवतमाळ यांचे संयुक्त विद्यमाने *कायदे विषयक जनजागृती* पंधरवडा निमित्त शासकीय निरीक्षणगृह बालगृहात जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.त्यात बालकांचे संदर्भात राबविण्यात येणारे विविध कायद्या विषयी कार्यक्रम प्रसंगी प्रथम न्याय दंडाधिकारी सुप्रिया लाड यांनी उपस्थित बालकांना माहिती देवून कायद्याचे महत्व पटवून सांगितले.बा.न्या. मं. डाटा ऑपरेटर निता डगवार हीचा वाढदिवस सुध्दा साजरा करण्यात आला. याप्रसंगी, बाल न्याय मंडळ सदस्य अॅड काजल कावरे, राजु भगत TWJ यवतमाळ शाखा चे एरिया मॅनेजर सागर मंचलवार यांनी बालकांसोबत हितगुज साधले. ब्रांच मॅनेजर सुरज मडगुलवार तसेच TWJ फाउंडेशन, द सोशल रिफॉर्म्स यवतमाळ चे सुमंत ठाकरे, गुरुबानीकौर सलूजा, कांचन हजारे,अधिक्षक गजानन जुमळे, समुपदेशक पुजा राठोड, सर्व काळजी वाहक यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

Copyright ©