यवतमाळ सामाजिक

आमदार संदिप भाऊ धुर्वे यांनी उपविभागीय अधिकारी पां यांची अतिवृष्टी संदर्भात भेट घेतली

तालुका प्रतिनिधी/घाटंजी
अमोल नडपेलवार

आमदार संदिप भाऊ धुर्वे यांनी उपविभागीय अधिकारी पां यांची अतिवृष्टी संदर्भात भेट घेतली

अतिवृष्टी नुकसान भरपाई रक्कम अधिकाऱ्याच्या दुर्लक्षित पणामुळे मिळत नाही असे माहिती शेतकऱ्यांनी आमदार साहेबा ना देण्यात आली

घाटंजी:आमदार धुर्वे यांनी उपविभागीय अधिकारी पांढरकवडा यांची अतिवृष्टी संदर्भात भेट घेतली
घाटंजी तालुक्यामध्ये महाराष्ट्र शासनाने अतिवृष्टी रक्कम देऊन सुद्धा अतिवृष्टी नुकसान भरपाई रक्कम अधिकाऱ्याच्या दुर्लक्षित पणामुळे मिळत नव्हती अनेक शेतकऱ्यांनी आमदार संदीपभाऊ धुर्वे यांचेकडे दूरध्वनी द्वारे तक्रारी केल्या होत्या या तक्रारी चे अनुसघाने दी 7 11 22 रोजी आमदार साहेबांनी उपविभागीय अधिकारी पांढरकवडा यासिनी नागराजन यांचेशी भेट घेऊन घाटंजी तालुक्यातील तहसील कार्यालय ने पाठविलेल्या यादी मध्ये तांत्रिक त्रुटी व अतिवृष्टी रक्कम मिळण्यास होत असलेला विलंब व झालेला भेदभाव या विषयी महसूल अधिकारी कृषी अधिकारी ग्राम विकास अधिकारी यांचे कडून आढावा घेऊन व बँक व्यवस्थापक सोबत बैठक घेऊन त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा करण्याचे निर्देश आमदार धुर्वे यांनी दिले

Copyright ©