यवतमाळ सामाजिक

भांब ( राजा) येथील पुरपिडीत सानुग्रह निधी पासून आजही वंचित

भांब ( राजा) येथील पुरपिडीत सानुग्रह निधी पासून आजही वंचित

ग्राम वाशियांची जिल्हा अधिकारी यांचे कडे मागणी

यवतमाळ तालुक्यातील भांब (राजा ) येथील मागील दोन ते तीन वर्षा पासून शंभर कुटुंब पावसाळ्यात रस्त्याचे पाणी घरात जाऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे राष्ट्रीय राज्य महामार्गावर सर्व्हिस रोड काढण्यात आला त्यात ठेकेदार दिलीप बिडकॉन यांनी चुकीच्या पद्धतीने नाल्या काढल्या ह्या नाल्या रस्त्याच्या उंच घेतल्याने शेतातले व आजू बाजूचे संपूर्ण पाणी गावातील शेकडो घरात जात होते त्या मुळे अनेक परिवार जिवमुठीत घेऊन आपल्या परिवारास रात्र रात्र मंदिरावर जागून काढल्या या घटनेची शनिशा उपविभागीय अधिकारी,तहसीलदार यांनी केली व तात्काळ मदत देण्याची घोषणाही केली मात्र त्या पीडितांना अजूनही मसाले भात या वेतीरिक्त कोणतीच मदत देण्यात आली नसल्याने आज जिल्हा अधिकारी यांना निवेदन देऊन मदत देण्याची मागणी भांब (राजा ) येथील सरपंच अनुप्रिया सुनील डिवरे उपसरपंच सदस्य व अनिल डिवरे व ग्रामस्थांनी केली आहे.

Copyright ©