यवतमाळ सामाजिक

शालेय पोषण आहार कर्मचारी संघटनेची जिल्हा परिषदेवर धडक

शालेय पोषण आहार कर्मचारी संघटनेची जिल्हा परिषदेवर धडक

(मानधन वाढवण्याची मागणी)

यवतमाळ आयटक, महाराष्ट्र राज्य शालेय पोषण आहार कर्मचारी संघटना जिल्हा शाखा यवतमाळ वतीने शालेय पोषण आहार कर्मचारी यांच्या प्रलंबीत मागण्यांना घेऊन यवतमाळ जिल्हा परिषदे दिली मोर्चाची धडक शासनाचे लक्ष वेधण्या करीता दि.३१-१०-२०२२ रोजी ११ वाजता श्रम शक्ती भवन आयुर्वेदीक दवाखाण्या जवळ यवतमाळ येथुन मोर्चाची सुरुवात झाली जोरदार घोषणा देत मोर्चा जिल्हापरीषेवर धडकला त्या ठीकानीज्ञ सभा घेऊन मुख्यकार्यकारी अधिकारी यांचे मार्फत प्रधानमंत्री , मुख्यमंत्री व शिक्षण मंत्री यांना निवेदन पाठविण्यात आले त्यात केंद्र सरकार दरमहा रू.१०००/– आणी राज्य सरकार दर महा रू.५००/- मानधन देत आहे तेही चार – चार महीने मीळत नाही दुसरीकडे भरमसाठ वाढलेली महागाई असतांना मानधन मात्र अतिषय तुटपुंजे , त्यामुळे ह्या जिवघेण्या महागाईत जगने कठीन झाले आहे , शासनाने मानधनात वाढ करावी म्हणून आयटकच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला. मोर्चाचे नेतृत्व आयटकचे कॉ.विजय ठाकरे , कॉ.दिवाकर नागपुरे , कॉ.मालती गांवडे यांनी केले मागण्या शालेय पोषण आहार कर्मचारी यांना किमान वेतन रू.२१०००/– मानधन वेतन द्या. शापोआ कर्मचारी यांना अर्धवेळ कर्मचारी न समजता पुर्ण वेळ कर्मचारी करून मानधन भरीव वाढ करा, सामाजीक सुरक्षा लागु करा, मानधन दर महीण्याला द्या, त्यांना रजा मंजुर करा त्या दिवशी आहार शीजविण्या करीता बदल्यात दुसऱ्या कर्मचाऱ्यांची मागणी करू नका,नागरी भागातील कर्मचाऱ्यांचे मानधन ग्रामीण भागाप्रमाने बॅंकेत करा, स्वयंपाकी मदतनिस यांना ड्रेस कोड द्या, शाळेची विद्यार्थी पटसंख्या कमी असल्यामुळे शाळा बंद करू नका, इत्यादी मागण्यां करण्यात आल्या यावेळी मालुताई सनगावकर,मंदा लोहकरे , यवतमाळ जिल्ह्यातील शेकडो शालेय पोषण आहार कर्मचारी मोर्चात सहभागी झाले होते

Copyright ©