यवतमाळ सामाजिक

धर्मा गुराख्यानी दहा गायी अंगावर बसवून नवीन उपक्रम नोदविला

धर्मा गुराख्यानी दहा गायी अंगावर बसवून नवीन उपक्रम नोदविला

भांब (राजा) येथे गाय गोधन कार्यक्रमाचे आयोजन
भांब (राजा) येथे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी गाय गोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यात विविध गावा मधून अनेक गुराख्याणी आपल्या गायी येथील मलकोजी महाराज देवस्थानावर आणून प्रथम प्रत्येक गुराख्यानी आपल्या गायी २० पायऱ्या असलेल्या मंदिरावर प्रदक्षिणा घालून खाली घोंगडे टाकून बसविण्याचा उपक्रम राबविले तर चानी कामठवाडा येथील धर्मा गुराख्यानी आपल्या अंगावर दहा गायी बसवून त्यांनी एक वेगळा विक्रम नोंदविला
या स्पर्धेत गायी मंदिरावर चाढविने या करीता प्रथम पुरस्कार १०००१ सचिन निंबाळकर साकुर,द्वितीय ६०००१,सुरेश गायकी बोरी गोसावी,तृतीय५००१ मंगेश ठाकरे बोरी सिंह, चौथे २५०१ मनोज राठोड बोरगाव ( दाभडी ), पाचवे १००१ पंडित देवकर हीवरी
गौरविण्यात आले तर गायी बसविण्यास प्रथम धर्मा गायकी चानि कामठावाडा, द्वितीय पुरस्कार २१०१ सौरभ जाधव चांदापुर, तृतीय पुरस्कार ११११,प्रवीण शेवाळे रुई,चतुर्थ पुरस्कार १००१,पाचवा पुरस्कार ५००१ महादेव राऊत घाटाना व समस्त गुराख्याणा आयोजकाकडून शेला,नारळ साडी व १०१ रुपया देवून सन्मानित करण्यात आले,या कार्यक्रमाचे आयोजन दुर्योधन रामटेके,मयूर चौधरी,देवेंद्र तिरमारे संतोष शेंडे,विनायक गोमासे,यांनी केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक,सूत्रसंचालन देवानंदभाऊ जाधव यांनी केले या वेळी यवतमाळ ग्रामीण पोलीस स्टेशन चे पोलीस उपनिरीक्षक गोपाल उताणे,कैलास लोथे, भगवान बावणे, गणेश बरेवार यांनी विशेष बंदोबस्त केला.

Copyright ©