यवतमाळ सामाजिक

श्री क्षेत्र हदगांव येथे श्रीमद् भागवत कथा ज्ञान यज्ञ व ज्ञानेश्‍वरी पारायणचे आयोजन

श्री क्षेत्र हदगांव येथे श्रीमद् भागवत कथा ज्ञान यज्ञ व ज्ञानेश्‍वरी पारायणचे आयोजन

यवतमाळ – वैकुंठवासी ह. भ. प. वामनराव महाराज गुघाने यांच्या कृपेने अखंड हरिनाम सप्ताह तसेच श्रीमद् भागवत कथा ज्ञान यज्ञ सप्ताह व ज्ञानेश्‍वरी पारायणचे बुधवार दि. 2 नोव्हेंबर ते 9 नोव्हेंबरपर्यंत श्री रुख्मिणी पांडूरंग संस्थान श्रीक्षेत्र हदगांव ता. जि. यवतमाळ येथे करण्यात आले आहे. प्रमुख वक्ते म्हणून पोफाळी येथील ह. भ. प. श्री सुरेश महाराज बाकडे तर ज्ञानेश्‍वरी पारायण वाचक व्यासपीठ ह. भ. प. श्री बाबाराव महाराज गझलवार हे उपस्थित राहणार असून भागवताची वेळ सकाळी 9.30 ते 12, दुपारी 3 ते 5 आहे.
नियमितपणे किर्तनाचे आयोजन करण्यात आले असून दि. 2 नोव्हेंबर रोजी रात्री 8 ते 10, ह. भ. प. श्री विष्णुबुवा ढगे (वाईमेंढी), दि. 3 नोव्हेंबर रोजी ह. भ. प. श्री रामकृष्ण महाराज आंबुसकर, अकोला, शुक्रवार दि. 4 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 ते 5 हिवराळे साहेब यांच्या भजनाचा कार्यक्रम तर रात्री 8 ते 10 ह. भ. प. श्री सुरेशजी महाराज बाकडे (पोफाळीकर), दि. 5 नोव्हेंबर रोजी ह. भ. प. श्री. किसनराव महाराज पाटील (मलकापूर), दि. 6 नोव्हेंबर रोजी ह. भ. प. श्री. केशव महाराज चवरे (चिंचोली) पुलगाव, दि. 7 नोव्हेंबर रोजी ह. भ. प. श्री. सागर महाराज परिहार (दर्यापूर), दि. 8 नोव्हेंबर रोजी हातगांव, सालोड, वरुड येथील भजनी मंडळींचे भजन तर दि. 9 नोव्हेंबर रोजी ह. भ. प. श्री. सुरेशजी महाराज बाकडे यांचे काल्याचे किर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे.
दि. 8 नोव्हेंबर रोजी सालोड वरुन श्री संत शिरोमणी ज्ञानेश्‍वर महाराजांची पालखी व वरुड येथून श्री. संत तुकाराम महाराजांचे पालखीचे वारकरी भजन मंडळी व भाविकांसह आगमन होईल. या प्रसंगी पालखीचे स्वागत करण्यात येईल. दि. 9 नोव्हेंबर रोजी सकाळी 5 वाजता ग्रंथ पालखीची मिरवणूक करण्यात येईल. या मिरवणुकीमध्ये सालोड, वरुड, अकोला बाजार, पोफाळी, माजर्डा, येवती, पिंपरी, कारेगांव, घटाणा, जवळा, हातगांव, पहूर, वाई, रुई, वडगांव, सावरगड, कोळंबी, झुली येथील दिंड्याचा समावेश होईल. सकाळी 11 वाजता ह. भ. प. श्री. सुरेशजी महाराज बाकडे यांचे काल्याचे किर्तन व ह. भ. प. श्री. श्रीरामजी हनुमंते सालोड यांच्या हस्ते काला व ह. भ. प. श्री. रघुनाथजी गडपतवार यांच्या दहीहांडीचा कार्यक्रम होईल. दुपारी 1 ते 4 श्री रुख्मिणी पांडूरंग संस्थान यांच्याकडून महाप्रसादाचा कार्यक्रम व पालखी सोबत येणार्‍या वारकर्‍यास श्रीफळ देण्यात येईल. तेंव्हा भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन श्री रुख्मिणी पांडूरंग संस्थान हातगांव चे अध्यक्ष ऍड. आर. के. मनक्षे व सचिव मोहनलाल वर्मा व समस्त संचालक मंडळांनी केले आहे.

Copyright ©