यवतमाळ सामाजिक

यवतमाळ चे खेळाडु राज्याचे नेतृत्व करण्यास सक्षम : माजी.जि.प.उपाध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर

यवतमाळ चे खेळाडु राज्याचे नेतृत्व करण्यास सक्षम : माजी.जि.प.उपाध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर

राष्ट्रीय स्पर्धा विजेत्या खेळाडुचा सत्कार

ऑक्टोंबर महिन्यात गुजरात येथे संपन्न झालेल्या ३६ व्या राष्ट्रीय खेळ या स्पर्धेत साॅफ्टबाॅल या क्रिडा प्रकारात महाराष्ट्र संघाने सुवर्णपदक पटकावले.महाराष्ट्राच्या संघात यवतमाळ च्या तिलक धनराज पुरके या खेळाडुचा सहभाग होता.या खेळाडुने संघाच्या विजयात अष्टपैलू कामगिरी करत खारीचा वाटा उचलला.तिलकने यवतमाळ जिल्ह्याच्या लौकिकात मानाचा तुरा खोवला..या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणुन माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर लाभले होते.तिलकला शाल,श्रीफळ, सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.यवतमाळ ही मैदानी खेळात आंतरराष्ट्रीय स्तरावर यवतमाळ चे नाव उंचावणारे खेळाडुंची भुमी आहे.त्यामुळे खेळाडुंनी कोणताही न्युनगंड न बाळगता सातत्याने आपला सराव करत रहावा.यवतमाळ मधील प्रतिभावान खेळाडु सातत्याने राष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट प्रदर्शन करत आहेत.व कुठल्याही स्तरावर खेळाडुंना कोणत्याही प्रकारची मदत करण्यास आपण तयार असल्याचे कार्यक्रमाचे अध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर यांनी ग्वाही दिली.यावेळी यवतमाळ जिल्हा साॅफ्टबाॅल असोसिएशन चे सचिव प्रा डॉ विकास टोणे, सहसचिव प्रा नरेंद्र फुसे, प्रा संदीप चावक, महेश तरोणे, नरेंद्र तरोणे, ओमेश हातगावकर, गुणवंत सोनटक्के,पंकज शेलोटकर, स्वप्निल चांदेकर, पियुष चांदेकर, प्रितम यादव, अक्षय बानोरे, आशिष येवले, सुशिल गजभिये,साहिल मोहोम्मद, तौफिक अब्दुल,रश्मी भानवाडीया आदी उपस्थित होते.

Copyright ©