Breaking News यवतमाळ

त्या खुनातील आरोपीला अखेर ग्रामीण पोलिसांच्या केले जेरबंद

त्या खुनातील आरोपीला अखेर ग्रामीण पोलिसांच्या केले जेरबंद

यवतमाळ ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत सावरगड शिवारात एका अनोळखी महिलेची हत्या करण्यात आली होती, तिची ओळख न पटल्याने प्रथम पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली, ६ सप्टेंबर रोजी तिचे प्रेत उत्तरी तपासणीसाठी पाठवण्यात आले अनोळखी महिलेची तपासणी केली असता मृतक महिलेच्या आईने यवतमाळ ग्रामीण पोलीस स्टेशनला येऊन ती माझीच मुलगी असून तिचा खून झाला आहे आणि हा खून आरोपी आरिफ अली आबिद अली वय 40 वर्ष राहणार इंदिरानगर भोसा रोड यवतमाळ यांनी केला अशी तक्रार दाखल करण्यात आली होती यावरून यवतमाळ ग्रामीण पोलिसांनी फरार आरोपीचा तपास घेण्यास सुरुवात केली असता हा आरोपी फरार असल्याने याची अमरावती नागपूर पुसद व इतरही परिसरात शोधाशोध केली असता मिळून न आल्याने त्याचा काही दिवसांनी सुगावा मिळाला आणि तो जुगार खेळण्याच्या आधी असल्यामुळे याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळताच या यवतमाळ ग्रामीण पोलिसनिरीक्षक किशोर जूनघरे यांनी एक पथक नेमून पोलीसअधीक्षक डॉ.पवन बनसोड यांच्या मार्गदर्शनाखाली वरील आरोपीच्या माहितीनुसार तो आदिलाबाद जिल्हा तेलंगाना राज्य मध्ये एका लॉजवर राहत असल्याची माहिती मिळाली यावरून पोलिसांनी वेश धारण करून त्याची माहिती घेतली असता व त्या लॉज वरील जुगार खेळत असल्याची निष्पन्न झाले यातच यवतमाळ ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक अमोल ढोकणे स इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी सापळा रचून धाड टाकली असता दोन महिन्यापासून फरार असलेला आरोपी आरिफ अली आबिद अली याला शिताफीने अटक केली याप्रकरणी यवतमाळ ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक अमोल ढोकणे संदीप मेत्रे नितीन कोवे सचिन पतंकमवार यांच्यासह पोलिसांनी ही कारवाई केली

Copyright ©