यवतमाळ सामाजिक

शालेय पोषण आहार कर्मचारी यांचा ३१ ला यवतमाळ जि.प.मोर्चा

शालेय पोषण आहार कर्मचारी यांचा ३१ ला यवतमाळ जि.प.मोर्चा

आयटक, महाराष्ट्र राज्य शालेय पोषण आहार कर्मचारी संघटना जिल्हा शाखा यवतमाळ वतीने शालेय पोषण आहार कर्मचारी यांच्या समस्या व मागण्यांना घेऊन शासनाचे लक्ष वेधण्या करीता दि.३१-१०-२०२२ रोजी ११ वाजता श्रम शक्ती भवन आयुर्वेदीक दवाखाण्या जवळ यवतमाळ येथुन मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे, केंद्र सरकार दरमहा रू.१०००/– आणी राज्य सरकार दर महा रू.५००/- मानधन देत आहे तेही चार – चार महीने मीळत नाही दुसरीकडे भरमसाठ महागाई वाढलेली आहे मानधन तुटपुंजे, त्यामुळे जगने कठीन झाले आहे , आम्हच्या मागण्यांकडे शासनाने लक्ष द्यावे म्हणून आयटकच्या नेतृत्वात मोर्चाचे आयोजन केले आहे. मागण्या शालेय पोषण आहार कर्मचारी यांना किमान वेतन रू.२१०००/– मानधन वेतन द्या. शापोआ कर्मचारी यांना अर्धवेळ कर्मचारी न समजता पुर्ण वेळ कर्मचारी करा, सामाजीक सुरक्षा लागु करा, मानधन दर महीण्याला द्या, त्यांना रजा मंजुर करा त्या दिवशी आहार शीजविण्या करीता बदल्यात दुसऱ्या कर्मचाऱ्यांची मागणी करू नका,नागरी भागातील कर्मचाऱ्यांचे मानधन ग्रामीण भागाप्रमाने बॅंकेत करा, स्वयंपाकी मदतनिस यांना ड्रेस कोड द्या, शाळेची विद्यार्थी पटसंख्या कमी असल्यामुळे शाळा बंद करू नका, यासह इतरही मागण्यांना घेऊन मोर्चा होणार आहे.तरी यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शालेय पोषण आहार कर्मचारी यांनी ज्यास्तीत ज्यात संखेने सहभागी व्हावे असे आवाहन कॉ.दिवाकर नागपुरे , जिल्हाध्यक्ष ,
आयटक ,महाराष्ट्र राज्य शालेय पोषण आहार कर्मचारी युनीयन जि.यवतमाळ यांनी केले आहे असे प्रसीद्धीस देलेल्या पत्रकाद्वारे कळविले आहे.

Copyright ©