यवतमाळ सामाजिक

शहरातील उप वाहतूक शाखा, बनल्या ग्रामीण वाहतूक दाराची कर्दनकाळ

शहरातील उप वाहतूक शाखा, बनल्या ग्रामीण वाहतूक दाराची कर्दनकाळ

शहरात वाहतुकीचा बट्याबोळ

यवतमाळ येथील वाहतूक शाखेचे डीव्हिजन बनविण्यात आल्याने ग्रामीण भागातील सर्वसामान्य वाहन धारक त्रस्त झाले आहे,ग्रामीण भागात प्रत्येक मार्गावरील वाहतूक उपशाखेचे पोलिस तैनात केले यांना केवळ वसुली करीता नियुक्त करण्यात आल्याने मोठ्या प्रमाणात खुले आम लूट सुरू करण्यात आली आहे वाहतूक पोलिसांच्या वसुली मुळे अनेक शेतकरी शेत मजुरांनी शहरात आपले वाहन नेने बंद केले आहे ,शहरात सतत कुठे ना कुठे रस्ता वाहणा मुळे बंद पडतो इथे एकही वाहतूक पोलीस शिपाई नसल्याने वाहतूक सुरळीत करण्यास एकही वाहतूक पोलीस दिसत नाही वाहन धारक मनात येईल तिथे वाहने उभी करतात मात्र एकही पोलीस सिपाई नसल्याने अनेक वाहतुकीची कोंडी होत असल्याचे दिसून येते, सर्व वाहतूक पोलीस प्रत्येक रस्त्यावर ग्रामीण भागातील सर्वसामान्य वेठीस धरून त्यांच्या कडून मोठ्या प्रमाणात पैशाची वसुली करताना दिसत आहे ग्रामीण भागातील कोणत्याही प्रकारचे वाहतूक पोलिसांचे काम नसतानाही वेगवेगळे उपशाखा (डीव्हिजन )पाडण्यात आले त्या मुळे गैर प्रकारांना वाव मिळत आहे याची पोलीस अधीक्षक यांनी हे वसुली डिव्हिजन बंद करावे अशी मागणी करण्यात येत आहे,जिल्ह्यातील उपशाखा केवळ महामार्गावरील वाहतूकिस अडथळा निर्माण करण्याचे काम करत आहे तर दुसरी कडे ग्रामीण भागांमधून शहरात मजुरी करण्यास जाणाऱ्या मजुरान कडून वसुली करण्याचे काम हि उपशाखा करीत आहे,या उपशाखे मुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे, शहरात वाहतुकीचा बट्ट्याबोळ झाला, याची अधीक्षक यांनी दखल घेऊन वाहतूक पोलीस उपशाखा बंद करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे.

Copyright ©