यवतमाळ सामाजिक

अस्तित्व फाउंडेशनचा दिवाळी पाडवा पारधी बेड्यावर साजरा

अस्तित्व फाउंडेशनचा दिवाळी पाडवा पारधी बेड्यावर साजरा

अस्तीत्व फाउंडेशनने लोकमित्र संस्थेसोबत मिळून किटा कापरा समोर, सावर गावाजवळ असलेल्या पारधी बेड्यावर दिवाळी पाडवा साजरा केला. लोकमित्र संस्था सावर येथील पारधी बेड्यावर अत्यंत प्रशंसनीय काम करीत आहे. पारधी समाजाच्या मुलांना शिक्षण देणे तसेच स्वच्छता आणि बाहेरील जगाशी या समाजाची ओळख करून देणे असे महत्वाचे काम तिथे ही संस्था करीत आहे.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मिलिंद वंजारी, सहसंचालक सहा. प्रा. रत्नदीप गंगाळे,
सोनाली मुनेश्वर, मोहन पारधी,
रिना , सचिन रंगे अशी ही चमू स्तुत्य उपक्रम तिथे राबवित आहे.
अश्याच वांचीतांसोबत दिवाळी साजरी करण्याची अस्तीत्व फाउंडेशनची परंपरा आहे. म्हणून या संस्थेशी जुळून अस्तीत्व फाउंडेशनने पारधी बेडा येथील संपूर्ण रहिवासी आणि शाळेतील सर्व विद्यार्थ्यांसाठी दिवाळी फराळ दिला. फराळाचे पूर्ण आयोजन गोपाल गोगे आणि सौ. अंजली गोगे यांनी केले.
या कार्यक्रमाला मिलिंद वंजारी, रत्नदीप गांगळे, सोनाली मुनेश्वर, मोहन पारधी, रिना मॅडम, सचिन रंगे, गोपाल गोगे, अंजली गोगे, अनिल चवरे, अमित भावसार, अविनाश धनेवार, कविता भोयर, करुणा धनेवार उपस्थित होते.
वरील सर्वांच्या सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वी झाला. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रीत्या ज्यांचे सहकार्य लाभले त्या सर्वांचे श्री. गोपाल गोगे यांनी आभार व्यक्त केले.

Copyright ©