यवतमाळ सामाजिक

अनाथ बालकांसोबत अविस्मरणीय दिवाळीचा क्षण – डॉ. पवन बनसोड जि.पो.अ.

अनाथ बालकांसोबत अविस्मरणीय दिवाळीचा क्षण – डॉ. पवन बनसोड जि.पो.अ.

यवतमाळ : शासकीय निरीक्षण गृह/बालगृहातील काळजी व संरक्षणाची गरज असलेली,कायद्याचे उल्लंघन केलेल्या बालकांसोबत नव्यानेच रुजू झालेले जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. पवन बनसोड यांनी अनाथ, निराधार, निराश्रित बालकां सोबत आपल्या अधिकारी/कर्मचारी यांचेसह एक अविस्मरणीय दिवाळी साजरी केली. संस्थेतील बालकांना कुटुंबाप्रमाणे दिवाळीचा सण साजरा करण्याचा आनंद मिळावा म्हणून सामाजिक भावनेतून प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, सामाजिक संस्था प्रतिनिधी यांचे उपस्थितीत दीपावली साजरी करण्याचे प्रशासनाचे वतीने आवाहन करण्यात आले होते, एक संवेदनशील अधिकारी म्हणून पोलीस प्रशासनाचे वतीने स्वतः संस्थेत भेट देऊन प्रत्येक बालकांची आस्थेने विचारपुस केली, या दिवाळीला काय केले? याची विचारणा करून माहिती घेतली. फटाके फोडून आनंदाने दिवाळी साजरी केल्याचे बालकांनी सांगितले. या प्रसंगी ते बोलतांना म्हणाले की आपण विपरीत परिस्थितीमुळे जरी या ठिकाणी आले असलात तरी एक आपल्याला जीवनात यशस्वी होण्याकरीता निसर्गानेच दिलेली ती एक काहीतरी वेगळ करुन दाखवण्याची संधी आहे.
जीवनात एखादी चूक झाली असल्यास ती सुधारणेची संधी प्रत्येकालाच असून त्यात सुधारणा करुन एक चांगले नागरिक बना,आपल्या चुकीचे परिणाम कुटुंबावर सुध्दा होतात त्यांना सुध्दा विविध अडचणींना सामोरे जावे लागू नये यासाठी आपण चांगले नागरीक बनावे, आपल्या चांगल्या शरीरयष्टीचा उपयोग विधायक कामासाठी, देशसेवेसाठी करावा, असे आवाहन त्यांनी याप्रसंगी बोलतांना केले. या प्रसंगी बालकांना दिवाळी निमित्य फराळ, मिठाई व फळाचे वाटप त्यांच्या हस्ते करण्यात आले.
शासकीय मुलांचे निरीक्षणगृह व बालगृहात दिवाळीचा सण बालकांसोबत साजरा करण्यात आला. या प्रसंगी त्यांचे सोबत अप्पर पोलीस अधिक्षक डाॅ, खंडेराव धरणे, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक, प्रदिप परदेशी, मुख्यालयातील अधिकारी/कर्मचारी, अवधूतवाडी पोलीस स्टेशनचे अधिकारी/कर्मचारी उपस्थित होतो. संस्थेचे अधिक्षक गजानन जुमळे यांनी बालकांनी तयार केलेले ग्रेटिंग कार्ड भेट देवून त्यांचे स्वागत करून संस्थेची माहिती दिली, समुपदेशिका पूजा राठोड यांनी बालकांची माहिती दिली व सर्वाचे आभार व्यक्त केले.
याप्रसंगी निरीक्षणगृहातील बालकांनी बनविलेल्या आकाश दिवे, ग्रेटिंग कार्ड, यांचे उपस्थिता कडून कौतुक करण्यात आले. संस्थेचे कर्मचारी सुनील हारगुडे, अविनाश राऊत, आकाश खांदवे उपस्थित होते, पोलीस प्रशासनाचे वतीने त्यांचे कडून सर्व बालकांना दीपावलीच्या शुभेच्छा देवून भावी जीवनात यशस्वी होण्याकरिता शुभ आशीर्वाद दिले.

Copyright ©