यवतमाळ शैक्षणिक

जिल्हास्तरीय सब-ज्युनियर कराटे स्पर्धा संपन्न

जिल्हास्तरीय सब-ज्युनियर कराटे स्पर्धा संपन्न

कराटे डो असोसिएशन यवतमाळ या संघटनेच्या वतीने जिल्हा क्रीडा संकुल, गोधनी रोड यवतमाळ मध्ये दि. 22 ऑक्टोंबर 2022 शनीवार सकाळी 10 वाजता ला यवतमाळ जिल्हा सब-ज्युनियर कराटे स्पर्धा व निवड चाचणी चे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धेत वेगवेगळ्या वयोगाटात कुमीते ईवेंट मधे जन्मजय इंगोले, युवान जयस्वाल, यश राऊत, ध्रुवराज जाधव, स्वर्णेश रोकडे, प्रयान सोनारकर, मिथुन गोहकार, जीवन प्रवार, दर्शन राऊत, शिवम डाके, रोहन पवार व आदर्श ठाकरे यांनी प्रथम क्रमांक पटकावला तसेच दुर्लभ कुमरे, सर्वेश साहू, प्रथमेश काकडे, शौर्य मोरे, चंदन राऊत, यशोज्वल निखाडे यांनी दुसरा क्रमांक पटकावला तसेच मुलींच्या वेगवेगळ्या वयोगाटात कुमीते ईवेंट मधे कु. ओवी डाखरे,कु. पूर्वी काकडे, कु. त्रीषा पढाडे, कु. कीर्ती शिंदे, कु. अदिती ईसाळकर, कु. आलिया चौहान, कु. त्रीषा चौहान, कु. योगेश्वरी जानेकर,कु. विदिशा खोंडे, कु. अक्षरा भिसे, कु. गौरी खोडकुंबे यांनी प्रथम क्रमांक पटकावला तसेच कु.समृद्धी ठाकरे यांनी दुसरा क्रमांक पटकावला तसेच काता ईवेंट मधे कु. अनुष्का शिंदे, कु.अक्षरा भिसे, कु. विदिशा खोंडे यांनी प्रथम क्रमांक पटकावला तसेच कु. त्रीषा चौहान यांनी दुसरा क्रमांक पटकावला तसेच शौर्य बनकेवार, यश राऊत, जीवन पवार, रोहन पवार यांनी प्रथम क्रमांक पटकावला तसेच ध्रुवराज जाधव, दर्शन राऊत यांनी दुसरा क्रमांक पटकावला या खेळाडूंनी आपले नाव होणार्‍या कराटे दो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र या संघटनेच्या वतीने महाराष्ट्र राज्य सब ज्युनिअर कराटे अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन दि. 5 व 6 नोव्हेंबर 2022 रोजी विभागीय क्रीडा संकुल, गारखेडा, औरंगाबादच्या स्पर्धा करीता निश्चित केले. सदर स्पर्धेत वणी, पूसद, बाभूळगाव या तालुक्यातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. विजेत्यां खेळाडूंचे संजय कोल्हे, प्रविण दिघाड़े, दिनेश रोकडे, नरेंद्र बाहेकर, संजय पाटील, सिद्धार्थ सोनारकर, सचिन डाफे, तिलक डोमडे, अनु बेलसरे या मान्यवरांनी हार्दिक अभिनंदन केले.
या खेळाडूंनी आपले यशाचे श्रेय प्रशिक्षक . रोहित केवारकर, विनोद खोडकुंबे, अजित मिश्रा, हेमंत उइके, अश्विनी उईके, हितेश महानुर व आई वडिलांना दिले तसेच या विद्यार्थियांचा कौतुक सौ. अर्चना कोठारी प्राचार्य शंकरलाल कोठारी विद्यामंदिर यवतमाळ, ओंकार चेके अध्यक्ष स्व.पी. एल. शिरसाट ग्रामीणपत्रकार संघ), मनोज झाडे, कु. हर्षा धुळे, रविन्द्र महानुर, मंथन रंगारी, गौरव महानुर, यश दरवेकर , गणेश उईके व मनोज गुजरे यांनी केले.

Copyright ©