यवतमाळ सामाजिक

निरीक्षणगृह बालगृहातील अनाथ, निराधार, बालकांसोबत दिवाळीचा सण साजरा

निरीक्षणगृह बालगृहातील अनाथ, निराधार, बालकांसोबत दिवाळीचा सण साजरा

यवतमाळ : शासकीय निरीक्षण गृह/बालगृहातील विधी संघर्षग्रस्त व काळजी व संरक्षणा ची गरज असलेली अनाथ, निराधार, निराश्रीत बालकांसोबत दिवाळीचा सण साजरा करणे हा एक अविस्मरणीय क्षण आहे. अशा बालकांना कुटुंबाप्रमाणे दिवाळीचा सण साजरा करण्याचा आनंद मिळावा म्हणून सामाजिक भावनेतून प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, सामाजिक संस्था प्रतिनिधी यांचे उपस्थितीत दीपावली साजरी करण्याचे महिला व बाल विकास विभाग, बाल न्याय मंडळ, बाल कल्याण समिती, अधीक्षक, यांचे वतीने आवाहन करण्यात आले.
दिवाळीचा सण आनंदाचा, मांगल्याचा, हर्ष उल्हासाचा प्रत्येकजण आपल्या कुटुंबासोबत मोठ्या आनंदाने, प्रेमाने साजरा करतो. कोविड-१९ मुळे गेली दोन वर्ष हा सण साजरा करण्यास मर्यादा आल्या परंतु या वर्षी संस्थेतील बालकांन सोबत दिवाळी साजरा करण्याचा योग आला या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानावरून बोलताना मा. प्रथम न्याय दंडाधिकारी सुप्रिया लाड यांनी आपले अनुभव व जीवनात केलेले संघर्षमय अनुभव सांगून बालकांना प्रोत्साहित केले. व जीवनात एखादी चूक झाली असल्यास ती सुधारणेची संधी प्रत्येकालाच असल्याचे प्रतिपादन त्यांनी याप्रसंगी बोलतांना केले. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा प्रशासनाचे वतीने मा. तहसीलदार कुणाल झाल्टे यांनी आपला शिक्षण घेत असलेला अनुभव सांगून, आपले ध्येय निच्छित करून संघर्षमय जीवन जगणारी बालके पुढे खूप मोठी होतात यासाठी बालकांच्या पाठीशी शासन ठामपणे उभे असल्याचे कार्यक्रम प्रसंगी मनोगत व्यक्त केले. सपत्नीक उपस्थित राहून त्यांचे कडून बालकांना दिवाळी निमित्य फराळ, मिठाई व फटाके वाटप करण्यात आले. जि.प. माजी अध्यक्ष प्रवीणभाऊ देशमुख यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. त्यांनी संस्थेच्या कामकाजाची माहिती जाणून घेवून, बालकाची सर्व माहिती जाणून घेतली व आपले अनुभव बालकांना सांगितले व जीवनात मोठे होण्यासाठी आपले ध्येय मोठे असावे असे प्रतिपादन या प्रसंगी त्यांनी केले.
शासकीय मुलांचे निरीक्षणगृह व बालगृहात दिवाळी सण बालकांसोबत साजरा करण्यात आला. यावेळी बाल कल्याण समिती अध्यक्ष श्री वासुदेव डायरे यांनी याप्रसंगी बाल कल्याण समितीची आव्हानात्मक भूमिका व सद्यस्थितीत समजा मध्ये घडणाऱ्या घटना, परिस्थिती विषद केली. बाल कल्याण समिती सदस्य अनिलभाऊ गायकवाड प्रयत्नाने विवेकानंद मित्र मंडळाचे सहकार्याने जिल्ह्यातील सर्व ११ बालगृहातील १२४ बालकांना व कंत्राटी कर्मचारी यांना दिवाळीनिमित्त बालकांच्या संस्थेत प्रत्यक्ष भेट देवून मुलां-मुलींच्या आवडीने, स्व पसंतीने दिवाळी ड्रेस घेऊन दिले. सर्व मुलांना आपल्या आवडीने पसंतीने कपडे खरेदी करण्याचा आस्वाद घेत कपडे खरेदी करून दिल्याची माहिती दिली, सर्व बालके उत्साही व आवडीचे कपडे मिळाल्याचा आनंद बालकांचे चेहऱ्यावर दिसून येत होता. या प्रसंगी ट्रेडस विईथ जाझ प्रा.ली. शाखा यवतमाळ याचे चमू द्वारा बालकांना खेळाचे साहित्य, फराळ, मिठाई व फटाके वाटप करण्यात आले. या प्रसंगी बाल कल्याण समिती सदस्य श्रीमती अॅड. प्राची निलावार, अॅड. लीना आदे, बाल न्याय मंडळ सदस्य, राजू भगत, सामाजिक कार्यकर्ते दिनेशभाऊ गोगुलवार, अरविंद वाढोणकर, अमित शिरभाते, श्रीकांत देशमुख, राम घोटेकर, ट्रेडस विईथ जाझ प्रा.ली. यवतमाळ याचे चमूचे सुरज माद्गुल्वर, संकेत पालकर, सुमंत ठाकरे उपस्थित होतो. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी ज्योती कडू यांचे मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. संस्थेचे अधिक्षक गजानन जुमळे यांनी कार्यक्रमाचे प्रस्ताविक व संचालन केले व समुपदेशिका पूजा राठोड यांनी सर्वाचे आभार व्यक्त केले.
याप्रसंगी निरीक्षणगृहातील बालकांनी बनविलेल्या आकाश दिवे, ग्रेटिंग कार्ड, काढलेले चित्र यांचे उपस्थितांचे वतीने कौतुक करण्यात आले. सर्व कर्मचाऱ्यानी बालकांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी बालकांची दिवाळी आनंदमय करण्यासाठी सुनील हारगुडे, अविनाश राऊत, आकाश खांदवे, मंगेश वाघाडे, प्रतिक जुमळे यांनी अथक परिश्रम घेतले. प्रशासकीय अधिकारी , लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, सामाजिक संस्था प्रतिनिधी यांचे कडून सर्व बालकांना दीपावलीच्या शुभेच्छा देवून भावी जीवनात यशस्वी होण्याकरिता शुभ आशीर्वाद दिले.

Copyright ©