यवतमाळ सामाजिक

अस्तित्व फाउंडेशन तर्फे कळी उमलताना या चर्चासत्राचे आयोजन

अस्तित्व फाउंडेशन तर्फे कळी उमलताना या चर्चासत्राचे आयोजन

अस्तित्व फाउंडेशन तर्फे वयात येणाऱ्या मुलींसाठी कळी उमलताना या चर्चासत्राचे आयोजन नगरपरिषद क्रमांक 20 मा जिजाऊ या शाळेमध्ये करण्यात आले. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून प्रशासकीय अधिकारी सौ. नीताताई गावंडे तसेच प्रमुख वक्त्या डॉक्टर सौ. वृषालीताई माने या होत्या. सर्वप्रथम मा जिजाऊ च्या प्रतिमे चे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात केली. कार्यक्रमाचे संचालन सौ कीर्ती ताई राऊत यांनी केले. लहान वयापासून ते मानसिक पाळी येईपर्यंत शारीरिक होणारे बदल याबद्दल माहिती दिली. मानसिक पाळी आल्यानंतर शरीराची वाढ मानसिक बदल त्यामध्ये घेण्यावयाची काळजी समज व गैरसमज याबद्दलही त्यांनी प्रकाश टाकला. किशोरवयीन अवस्थेमध्ये होणारा त्रास, कमी वयात पाळी येणे, मानसिक आजार, इतर आजार याबद्दल सुद्धा त्यांनी माहिती दिली. तसेच रोज व्यायाम योग्य आहार, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे संस्कार याबद्दल त्यांनी जागृत केले. बरे वाईट वेळीच ओळखून योग्य तो निर्णय घेणे हे त्यांना उदाहरणाद्वारे समजून दिले. भविष्यात सदृढ व सशक्त तसेच सुशिक्षित स्त्रिया कशा घडतील यावर भर दिला. कारण आजच्या या कोवळ्या कळ्या उद्याच्या मजबूत समाज घडविणार आहे याबद्दल त्यांच्या बोलण्यातून सर्व गोष्टीवर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे नियोजन कीर्ती राऊत यांनी केले. या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी अस्तित्व फाउंडेशनचे अध्यक्ष अलका कोथळे, लताताई खांदवे, सारिका ताजने, करुणा धने वार, भावना लेडे, कविता भोयर, प्रीती वानखेडे, तसेच या कार्यक्रमात शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. निर्मला खडसे मॅडम यांचे सहकार्य लाभल्यामुळे कार्यक्रम यशस्वी होऊ शकला. रेणुका धोबे, आंबेकर सर रेखा डफडे कल्पना जुनघरे वैजयंती भंडारकर रेखा वरखडे बनकर टेकाम ज्योती धरणे प्राजक्ता बापट भूमिका या त्यांच्या पूर्ण टीममुळे कार्यक्रम यशस्वी झाला.

Copyright ©