यवतमाळ सामाजिक

*महाराष्ट्र राज्य पर्यटन व सांस्कृतीक कार्य विभागतर्फे यवतमाल का राजा सेवा परिवार जिल्हास्तरीय प्रथम पुरस्काराने सन्मानीत*

 

यवतमाळ –

यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक लोकप्रीय नवयुवक गणेश उत्सव मंडळ मारवाडी चौक यवतमाल का राजा सेवा परिवार नुकत्याच झालेल्या गणेश उत्सवात उत्कृष्ट गणेश उत्सव स्पर्धा महाराष्ट्र राज्य पर्यटन व सांस्कृतीक कार्य विभागतर्फे घेण्यात आली. त्यामध्ये नवयुवक गणेश मंडळ यवतमाळ व यवतमाल का राजा सेवा परिवाराला जिलास्तरीय प्रथम पुरस्कार 25 हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह व अभिनंदन पत्र देऊन महाराष्ट राज्याचे लोकप्रिय मंत्री ना. सुधिर मुनगंटीवार यांच्या शुभहस्ते प्रशासनाच्या प्रमुख अधिकार्‍यांच्या उपस्थितीत रविंद्रनाथ टागोर नाट्यगृह प्रभादेवी, मुंबई येथे सन्मानीत करण्यात आले.
मागील 59 वर्षापासून नवयुवक गणेश मंडळ मारवाडी चौक, विविध सामाजिक उपक्रम राबवित असून मागील तीन वर्षापासून कोरोना काळात यवतमाल का राजा नवयुवक गणेश मंडळाने कोरोणा काळात व गणेश उत्सवादरम्यान अन्नदान, रक्तदान, वस्त्रदान, विविध प्रकारची आरोग्य शिबीरे, गरजु रुग्णांना आर्थिक सहकार्य तसेच गणेश विसर्जनासाठी न.प. प्रशासनाला तसेच कोरोना काळात जिल्हा प्रशासनाला आपली अनमोल सेवा प्रदान करुन यवतमाळकरांची मने जिंकली होती. यावर्षी सुध्दा यवतमाल का राजा नवयुवक गणेश मंडळाने गणेश उत्सवादरम्यान नयनरम्य शोभा यात्रा तसेच विविध प्रकारचे सामाजिक लोकोपयोगी उपक्रम राबविले होते. महाराष्ट्र राज्याच्या पर्यटन व सांस्कृतीक कार्य विभागातर्फे यवतमाल का राजा सेवा परिवाराला जिल्हास्तरीय प्रथम पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले. त्याबद्दल नवयुवक गणेश मंडळाचे यवतमाळ जिल्ह्यात सर्वत्र अभिनंदन होत आहे. याबाबत मंडळाचे अध्यक्ष मनोज पसारी यांनी राज्य प्रशासन व जिल्हा प्रशासनाचे आभार मानून सेवा कार्यासाठी सदैव तत्पर राहण्याचे वचन दिले.

Copyright ©