यवतमाळ सामाजिक

सेक्युलर भारतात धर्मावर आधारित चालणारी ‘हलाल प्रमाणपत्र’ व्यवस्था तात्काळ बंद करा – हिंदू सघटनाची मागणी

  1. सेक्युलर भारतात धर्मावर आधारित चालणारी ‘हलाल प्रमाणपत्र’ व्यवस्था तात्काळ बंद करा हिंदू सघटनाची मागणी

सेक्युलर भारतात धर्मावर आधारित चालणारी ‘हलाल प्रमाणपत्र’ व्यवस्था तात्काळ बंदकरून,असे प्रमाणपत्र देणा-या संस्थांची चौकशी करावी – हिंदुत्वनिष्ठ संघटनांची मागणी
यवतमाळ –  सध्या भारतीय मुसलमानांकडुन  प्रत्येक पदार्थ, वस्तू इस्लामनुसार वैध अर्थात ‘हलाल’ असण्याची मागणी केली जाऊ लागली आहे. ही मागणी केवळ मांसापुरती मर्यादित राहिली नसुन धान्य, फळे, सौंदर्यप्रसाधने, औषधे आदी. उत्पादनेही हलाल नामांकित असावीत, अशी मागणी मुसलमान करत आहेत. त्यासाठी व्यापा-यांना आवश्यकता नसतांनाही प्रत्येक उत्पादनासाठी २१ सहस्त्र ५०० रुपये भरुन ‘हलाल प्रमाणपत्र’ घ्यावे लागत आहे. परंतु मुसलमान समाजाच्या मागणीमुळे बहुसंख्यांक हिंदु समाज, मुसलमानेत्तर अन्य अल्पसंख्यांक समाज यांना हलाल प्रमाणित पदार्थ किंवा उत्पादने घ्यायला लावणे, हे धार्मिक अधिकारांवर गदा आणणारे आहे. त्यामुळेचं धार्मिक भेदभाव करणा-या ‘हलाल सर्टिफिकेशन’ वर भारतात बंदी आणावी. ज्या खासगी आस्थापनांना ‘हलाल प्रमाणपत्र’ देण्याची अनुमती देण्यात आली आहे, त्यांची अशी अनुमती त्वरित रहित करण्यात यावी. तसेचं या संस्थांची सीबीआय द्वारे चौकशी करुन या निधीचा वापर आतंकवाद्यांना साहाय्य करण्यासाठी झाला का ?, राष्ट्रीय सुरक्षेला काही धोका नाही ना ?, याची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी मा. पंतप्रधान यांना निवदनाद्वारे करण्यात आली.
यवतमाळ येथील मा. निवासी उपजिल्हाधिकारी श्री. ललितकुमार व-हाडे यांच्यामार्फत 11 ऑक्टोंबर ला हे निवेदन  पाठवण्यात आले. निवेदन देतेवेळी श्रीराम जन्मोत्सव समितीचे श्री. मनोज औदार्य, भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन समितीचे श्री. विनोद अरेवार, जिल्हा बार असोसिएशन चे माजी अध्यक्ष अधिवक्ता. अजय चमेडिया, भारतीय जनता पार्टी चे जिल्हा सचिव श्री. सुरज गुप्ता, श्री. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. सागर लुटे, योग वेदांत सेवा समितीचे श्री. यशवंत वैरागडे, श्री. विठ्ठल इजगमवार, सनातन संस्थेच्या सौ. सुनिता खाडे, हिंदु जनजागृती समितीचे जिल्हा समन्वयक श्री. मंगेश खांदेल यांसह संघटनांचे अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Copyright ©