यवतमाळ सामाजिक

लीळा चरित्र ग्रंथ दिंडी व भव्य शोभायात्रा सपंन्न

लीळा चरित्र ग्रंथ दिंडी व भव्य शोभायात्रा सपंन्न

सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अवतरण वर्ष अष्टशताब्दी महोत्सवानिमित्त भव्य लीळाचरित्र ग्रंथ दिंडी व भव्य शोभायात्रा आयोजित करण्यात आली या कार्यक्रमानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमात सर्वप्रथम मूर्तीस मंगलस्नान व वीडा अवसर परम पूज्य श्री आचार्य प्रवर कवीश्वर कुलभूषण लाड बाबा हरसुल यांच्या पिढीतील महत्त्वपूर्ण प्रसाद वंदन देवपूजा व ग्रंथ दिंडीचे आयोजन करण्यात आले ही ग्रंथ दिंडी गोपाळ नगर प्रमोदभाऊ गोटे यांच्या निवासस्थानापासून काढण्यात आली संपूर्ण गावामधून काढण्यात आली अनेक ठिकाणी ग्रंथाचे पूजन करण्यात आले या भव्य शोभा यात्रेचा समारोप निधी मंगल कार्यालय येथे करण्यात आला या ग्रंथ दिंडीत शोभा यात्रेत श्री दत्त भजनी मंडळ जांभोरा श्री चक्रधर महिला भजनी मंडळ जांभोरा,श्री दत्त भजनी मंडळ ब्रम्ही श्री दत्त भजनी मंडळ पिंपळगाव डुबा संत सेवालाल हरिपाठ मंडळ पिंपळगाव डुबा श्रीकृष्ण महिला भजनी मंडळ कोटंबा श्रीकृष्ण मंदिर प्रबोधन मंडळ सुकळी इत्यादी मंडळांचा या रॅलीमध्ये सहभाग होता यावेळी ज्ञान सत्र कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले सभा अध्यक्ष म्हणून परमपूज्य श्री आचार्य प्रवर कवीश्वर कुलाचार्य कारंजेकर बाबा महानुभाव राजापेठ अमरावती मुख्य उपस्थिती परमपूज्य महंत श्री आचार्य प्रवर कवीश्वर कुलभूषण लाडबाबा हरसुल सभामंडपाचे उद्घाटन परमपूज्य महंत श्री गोविंदराज बाबा रिद्धपूरकर जवळा खांड प्रमुख मार्गदर्शक परमपूज्य महंत श्री विनय मुनी उपाध्ये वैरागी बाबा पंजाबी अध्यक्ष अमरावती जिल्हा ग्रामीण महानुभाव सेवा मंडळ अमरावती प्रमुख अतिथी परमपूज्य महंत श्री वैद्यराज बाबा आराध्य प पू. प. म. श्री चक्रपाणि बाबा करंजकर श्री प.पू. प.म.केशवराज बाबा कारंजेकर श्री नेवासकर बाबा व प. पु प म श्री संतराज बाबा कोल्हेकर
प.पू.ई केशव मुनी दादा अमृते व प. पु ई.श्री जनार्दन दादा कारंजेकर पप्पू श्री गोवर्धन दादा वनवले इत्यादी संत महंत या कार्यक्रमास प्रामुख्याने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन परम सेवक कीर्तनाचार्य दादारावजी पिंपळगावकर यांनी केले यावेळी जिल्ह्यातील अनेक महानुभाव पंथीय सदभक्त या कार्यक्रमास उपस्थित होते.

Copyright ©