यवतमाळ सामाजिक

हिवरी सर्कल मधील मागील तिन दिवसापासून मुसळधार पावसाने अनेकांच्या जमिनी खरडून गेल्या

 

हिवरी सर्कल मधील मागील तीन दिवसापासून मुसळधार पावसाने अनेकांच्या जमिनी खरडून गेल्या 

धीरज शेरकर प्रतिनिधी

 

यवतमाळ तालुक्यातील ११ व १२ ,१३ ऑक्टोंबर ला झालेल्या मुसळधार पावसाने सोयाबीन तर मातीमोल झालेच परंतु पऱ्हाटी तुर,भाजी पाला हि खरडून गेल्याचे चित्र दिसून येत आहे मंगळवार ला परतीचा पाऊस मुसळधार झाल्याने राहिलेले पीकही उध्वस्त करून गेला सुरवातीला संतत धार पावसाने पीक होऊ दिले नाही अनेक शेतकऱ्यांनी तीबार पेरण्या केल्या एक तरी पीक होईल या आशेने अनेकांच्या आशा प्रलंबित झाल्या होत्या मात्र आसमानी संकट थांबता थांबेना शेतकऱ्यांना हे वर्षच शाप ठरले आहे,एकरी चाळीस ते पन्नास हजाराहून जास्त खर्च आला आणि शासनाने तूट पंजी मदत जाहीर केली ती हि अजून प्रयंत कोणत्याही प्रकारची मदत दिली नाही पुन्हा या पावसाने शेतकऱ्याला जगणे अशक्य केले आहे,याची शासनाने गंभीर दखल घेऊन शेतकऱ्यांना दिवाळी पूर्वी तातडीने मदत द्यावी व ठाकरे सरकारनी दिलेले आश्वासन शिंदे सरकारनी पूर्ण करावे अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

Copyright ©