यवतमाळ सामाजिक

दिग्रस येथील संघटनांचा ‘हलाल’ प्रमाणपत्राला विरोध

दिग्रस येथील संघटनांचा ‘हलाल’ प्रमाणपत्राला विरोध

खाद्यपदार्थांशी संबंधित प्रमाणपत्र देणा-या FDA, FSSAI सारख्या ‘सेक्युलर’ शासकीय संस्था असतांना ‘हलाल प्रमाणपत्र’ देण्याची अनुमती खासगी ‘इस्लामिक’ धार्मिक संस्थांना का ?

भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटूंब कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरण (FSSAI), तसेचं प्रत्येक राज्यात स्वतंत्र अशी अन्न आणि औषध प्रशासन विभाग (FDA) अस्तित्वात आहे. एकीकडे खाद्यपदार्थांशी संबंधित प्रमाणपत्र देणारी शासनाची व्यवस्था असतांना ‘हलाल प्रमाणपत्र’ देण्याची अनुमती खासगी ‘इस्लामिक’ धार्मिक संस्थांना का देण्यात आली आहे. याच समवेत सरकार जेव्हा अशा पदार्थांना प्रमाणपत्र देते, तेव्हा त्याची चाचणी घेतली जाते. हलाल चे प्रमाणपत्र देतांना, मात्र शासनाचे कोणतेही बंधन पाळले जात नाही. असे असतांना धार्मिक आधारावर एखाद्या खासगी संस्थेकडुन हलाल प्रमाणपत्राच्या नावे केली जाणारी शुक्ल आकारणी वैध का ठरवली जात आहे ?, या खाद्यपदार्थांमधुन कोणाला गंभीर आरोग्य समस्या उद्भवल्यास त्याचे दायित्व कोण घेणार ? असा प्रश्न ‘हलाल’ प्रमाणपत्राच्या माध्यमातुन निर्माण होत आहे. शासनाच्या रेल्वे,एअर इंडिया या सरकारी आस्थापनांमध्ये हलाल प्रमाणित पदार्थचं पुरवले जात आहेत. त्यामुळे धर्माधारित चालणारी ‘हलाल प्रमाणपत्र’ व्यवस्था तात्काळ बंद करण्याविषयी आणि असे प्रमाणपत्र देणा-या सर्व संस्थांची चौकशी करण्याची मागणी येथील व्यापारी, हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने करण्यात आली.

या विषयीचे निवेदनं येथील मा. तहसीलदार श्री. प्रविण धानोरकर यांना देण्यात आले. यावेळी भारतीय जनता पार्टीचे श्री. प्रमोद बनगीनवार, श्री. रविंद्र अरगडे, श्री. मनोज राठोड, श्री. सुभाष काटकर, श्री. रमेश करवा, शिवसेनेचे श्री. संजय कुकडी, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान चे श्री. शुभम गावंडे, पतंजली योग समितीचे श्री. सागर बाहेकर, पत्रकार श्री. अभय इंगळे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्री. पांडुरंग दारोळकर, हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुशिल जोशी यांसह संघटनांचे अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Copyright ©