यवतमाळ सामाजिक

15 आक्टोंबर भारतीय वृत्तपत्र विक्रेता दिवस जाहीर करा

15 आक्टोंबर भारतीय वृत्तपत्र विक्रेता दिवस जाहीर करा

महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेची मागणी
यवतमाळ: 15 ऑक्टोंबर हा दिवस भारताचे माजी राष्ट्रपती आणि मिसाईल मॅन म्हणून ओळखले जाणारे दिवंगत डॉ़एपीजे अब्दुल कलाम यांचा वाढदिवस़ हा दिवस सरकारकडून वाचन प्रेरणा दिवस म्हणूनही साजरा केला जातो, डॉ कलाम यांना वाचनाची खूप आवड होती. या शिवाय त्यांनी आपल्या आयुष्याची सुरूवात वृत्तपत्र वितरणातून केली. त्यामुळे हा दिवस भारतीय वृत्तपत्र वितरण दिवस जाहीर करावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेने पंतप्रधानांकडे केली आहे.
जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या मार्फत दिलेल्या निवेदनानुसार डॉ. कलाम यांच्या कुटूंबातील सदस्य आजही वृत्तपत्र वितरणाचे काम करत आहेत, 15 आक्टोबर 2018 रोजी संघाकडून नांदेड येथे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली वितरण दिवस म्हणून साजरा करण्यात आला. याशिवाय देशभरातील 15 राज्यामध्येही हा दिवस साजरा करण्यात येत आहे, त्यामुळे केंद्राकडून हा दिवस वृत्तपत्र वितरण दिवस म्हणून साजरा करण्यात यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र उपाध्यक्ष संतोष शिरभाते, किशोर भेदरकर, अशेक शिंदे, किरण कोरडे, राजु हनवते, कमलनयन कोठारी, श्रीराम खत्री, सचिन कदम, प्रविण आगलावे, सुनिल बोरकर, रविंद्र चव्हाण, तुषार गुज्जलवार, मदन केळापूरे आदि उपस्थित होते.

Copyright ©