यवतमाळ सामाजिक

अधिष्ठाता यांच्या एकसुत्री कारभाराने रुग्णांना धरल्या जात वेठीस

अधिष्ठाता यांच्या एकसुत्री कारभाराने रुग्णांना धरल्या जात वेठीस

यवतमाळ:येथिल श्री वसंतराव नाइक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, यवतमाळ चे अधिष्ठाता फूल पाटिल यांच्या विचित्र आदेशाने रुग्णाना मोठ्या प्रमाणात वेठीस धरून एक प्रकारे जाणून बुजून त्रास देण्याचा प्रकार सुरू आहे.अधिष्ठाता यांनी गेल्या काही दिवासां पासून वार्ड कडे जाणारे गेट संपूर्ण गेट बंद करने सुरू केले आहे,तर काही रुग्णानांचे वार्ड कडे जाणारे मार्ग बदलवले ज्या मुळे रुग्नांना व सोबत असणाऱ्या नातेवाइकांना मोठ्या प्रमाणात तारेवरची कसरत करुण आपल्या रुग्ना जवळ जावे लागत होते परंतु गेल्या 2 ते 3 दिवासां पासून अधिष्ठाता यांनी अपघात विभागाचे गेट वर बैरिकेट लाउन ताराने बांधून अपघाग विगाचे गेट बंद करने सुरु केले अधिष्ठाताच्या या निर्णयाने सामान्यात भड़का उठण्याचे संकेत दिसून येत आहे.व काहिंचे सुरक्षा रक्षकांसोबत वादही होने सुरु झालेले आहे.अधिष्ठाताच्या या विचित्र पना मुळे सुरक्षा रक्षक हि त्रस्त होत असल्याचे दिसून येत आहे कारण नको त्या प्रश्नांचे उत्तर त्यांना द्यावे लागत आहे.व अपघात ग्रस्त रुग्णाला सोपा पडनारा मार्ग आज कठिन झाला असल्याचे पाहायला मिळाले आहे.महा तथा रुग्णालयातील महत्वाच्या अडचणी सोडून अधिष्ठाता असे प्रकार करून काय साध्य करणार असा सवाल सर्वसामान्य रुग्णांना पडत आहे
या सर्व बाबीनवार निरीक्षण ठेवन्यासाठि रुग्नांच्या समस्या सोड़वन्यासाठी स्थापित केलेले अभ्यागत मंडळ मुंग गिळून गप्प का ? या बाबत अजूनही काही वाच्यता होत नाही .अधिष्ठाताच्या या मनमानी कारभारावर कुणाचे लक्ष का? नाही, कुठे पानी मूरत आहे.याचे निदान अजूनही लागलेले नाही. हि बाब अत्यंत गंभीर असून रूग्ना सोबत त्यांच्या नातेवाईकांना मज्जाव केल्या जातो रुग्णालयात अपुऱ्या कर्मचाऱ्यंमुळे रुग्णांना वेळीच मदत मिळत नाही त्या मुळे रुग्णाचे हाल होत आहे ,असल्या प्रकारच्या छळा मुळे सर्व सामान्यांनी येथे उपचार घेऊच नये जेणे करून शासनाच्या तिजोरीवर भार येणार नाही असा तर या मागील उद्देश नसावा असे अनेक तर्क वितर्क लावल्या जात आहे या कडे पालक मंत्री लक्ष देतील काय?

Copyright ©