यवतमाळ सामाजिक

जन्मदात्या पित्याची मुलानेच केली निर्घृण हत्या

  1. जन्मदात्या पित्याची मुलानेच केली निर्घृण हत्या

दिग्रस् तालुक्यातील रुई तलाव येथील मन सुन्न करणारी घटना

आज दिनांक 11 ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान रुई तलाव येथील धनसिंग पडवाळ याने आपल्या जन्मदात्याची हत्या केल्याची चर्चा गावभर पसरल्याने .चक्क मुलानेच स्वतःच्या वडिलांची हत्या केल्याने एकच खळबळ माजली होती. या प्रकरणी रूई च्या पोलिस पाटलांनी या घटनेची माहिती पोलिसांना देताच.रूई येथील घटना स्थळी दाखल होऊन हत्या करणाऱ्या मुलाला पोलिसांनी अटक केली आहे. अटक झालेल्या मुलाचे नाव धनसिंग गुलाब पडवाळ असून वडील गुलाब पडवाल हे आपल्या शेत शिवारात असताना त्याच्या मुलाने धारदार कुऱ्हाडीने वार केल्यामुळे ते जागेवरच गतप्राण झाले. पोलिसांनी घटनास्थळ गाठून त्याला अटक केली आहे. कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पुढील तपास दिग्रास पोलिस करीत आहे

Copyright ©