यवतमाळ सामाजिक

दिग्रस पोलिसांनी पकडली चार लाखाची बनावट देशी दारू

दिग्रस पोलिसांनी पकडली चार लाखाची बनावट देशी दारू

दिग्रस तालुक्यातील मांडवा-बोरी येथून अरुणावती धरणाचे रस्त्याने वाहन क्र,एम एच,17 ए,जी,9778 (आयचर)हे वाहन दि, 10 ऑक्टोबर चे रात्री 1 चे दरम्यान संशयास्पद गेले असल्याची माहिती. रात्रपाळीवर ड्युटीवर असणारे ए,पी,आय, वसंत जाधव यांना पोलीस पाटील यांचेकडून कळले असता ठाणेदार सोनुने यांचे आदेशानव्ये दिग्रस पो,स्टे पथक घटना स्थळी पोहचून सदर वाहनांची पाहणी करून पंचासमक्ष पाहणी केली असता 117 देशी दारू टॅगो चे बॉक्स त्यामध्ये 90 मि.ली.भरलेली दारू भरलेल्या शीशा एकूण चार लाखाची देशी दारू,व पाच लाखाचे वाहन जप्त करण्यात आले, ही कारवाही पो,हे,काँ,बाबाराव पवार ए,एस,आय, माळोदे,गजानन चव्हाण यांनी केली असून पुढील तपास ठाणेदार सोनीने यांच्या मार्गदरशनाखाली परभाकर जाधव हे करीत आहे,

Copyright ©